Shukra Nakshatra Parivartan 2025: ग्रह-नक्षत्रांची चाल कधी कोणासाठी काय घेऊन येईल, हे सांगणे अवघड. पण, अनुभवी ज्योतिषी सांगतात की, कधी कधी एक छोटा गोचरही जीवनात भलेमोठे बदल आणू शकतो. ९ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:३४ वाजता शुक्र ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि बुध-शुक्र संचारित ऊर्जा काही राशींच्या लोकांना जणू चमकदार भाग्य देऊन जाण्याची शक्यता आहे. हा काळ २० डिसेंबरपर्यंत टिकणार असून, त्याचा सर्वाधिक मजबूत प्रभाव तीन राशींच्या लोकांवर दिसू शकतो.

मिथुन : अडथळ्यांवर मात करून नव्या वाटांकडे!

हे दहा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी जणू शांततेतून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासासारखे. बराच काळ मनात दबा धरून बसलेल्या चिंतेच्या सावल्या जणू दूर पळू लागतील. घरातील वातावरण हलकं-फुलकं आणि आशावादी होऊ शकतं. आईच्या आरोग्यात सुधारणा जाणवू शकते आणि त्यामुळे घरात सकारात्मकता वाढेल. जणू आतापर्यंत बंद असलेली दारं एकेक करून उघडू लागतील. कामातील कागदपत्रे, बँकिंग, मालमत्ता, प्रॉपर्टी किंवा कर्जासंबंधीची कामे पुढचे पाऊल गाठतील. जिथे पूर्वी ‘होईल का?’ असे वाटत होते, तिथे आता ‘होणारच!’ अशी ऊर्जा मिळू शकते.

पैसा अडकलेला असेल, तर त्यात हालचाल दिसू शकते. व्यवसायात नवीन संधी, नवीन ग्राहक, आणि छोट्या, पण फायदेशीर व्यवहारांची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये जणू वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि त्यातून नवे प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. भावनिक आयुष्यही उजळू शकते. एखादा जुना गैरसमज मिटू शकतो, नात्यात मोकळेपणा आणि सौहार्दता वाढू शकते. हे दिवस जणू तुमच्यासाठी री-स्टार्ट बटण दाबल्यासारखे असतील.

कन्या : न्याय, आदर, प्रतिष्ठा आणि आर्थिक शक्तीची वाढ!

हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी जणू धुक्यातून बाहेर येत अचानक स्पष्ट आकाश दिसल्यासारखा असेल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षभर झटत होता, त्यांचे निकाल तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. कायदेशीर खटले, सरकारी कामे किंवा अधिकाऱ्यांशी असलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. बऱ्याच जणांना महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही होणे, न्यायलायात सकारात्मक निकाल येणे किंवा दीर्घकाळ प्रलंबित कामे वेगाने पुढे सरकणे, असे अनुभव मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालावधी विशेष शुभदायी ठरू शकतो.

नवे करार, भागीदारी, दूरच्या शहरातील किंवा परदेशांतील संधी या सगळ्या शक्यता वाढू शकतात. जणू व्यवसायाच्या प्रगतीचे चक्र पुन्हा जोमाने फिरू लागेल. पैशांचा प्रवाह वाढताना दिसू शकतो. वरवर छोटा वाटणारा, पण फार महत्त्वाचा आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होऊ शकतो. रोकड स्थिती सुधारू शकते. प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही हा काळ लाभदायी असेल. एखाद्या मोठ्या सभेत तुमच्या नावाचा उल्लेख, वरिष्ठांकडून प्रशंसा, नातेवाइकांमध्ये तुमच्या कामाबद्दल कौतुक अशा घटना होऊ शकतात. मानसिक स्थैर्य वाढेल, मन हलके होईल आणि आत्मविश्वासाची नवी धार मिळेल.

मीन: धनलाभ, यशाची भरारी आणि घरात शुभकार्याची चाहूल!

शुक्राचा प्रभाव मीन राशीसाठी जणू घरात सुखाचा दिवा पेटवणारा. हा काळ तुमच्या इच्छांची पूर्तता करणारा, स्वप्नांना दिशा देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत होता, तो पैसा येण्याची शक्यता. नोकरीत बदल, बढती किंवा तुमच्या कष्टाची दखल घेऊ,न तुम्हाला नवी जबाबदारी मिळण्याचे संकेत. व्यवसायात ग्राहक वाढतील, नवे प्रोजेक्ट मिळतील किंवा एखादा जुना व्यवहार फायदेशीरपणे पूर्ण होऊ शकतो.

घरगुती वातावरणात आनंद वाढू शकतो. मुलांच्या प्रगतीची बातमी, घरात छोटासा समारंभ, नातेवाईक येणे-जाणे किंवा घरात शांतता निर्माण होणे. मीन राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढू शकते. काहींना समाजात मान-सन्मान, पुरस्कार, व्यावसायिक ओळख मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास, प्रसन्नता आणि समाधानाचे रंग जीवनात पसरतील. जणू एक नवीन दिशा तुमच्या दारात उभी राहिल्यासारखे वातावरण असेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)