Which Job Is Perfect For You As Per Zodiac: अनेकदा नोकरीसाठी कितीही प्रयत्न केला, वशिले लावले, हजारो ठिकाणी अर्ज केले तरी हवं तसं यश मिळत नाही.. यामागे मुख्य कारण म्हणजे कदाचित ते क्षेत्र तुमच्यासाठी बनलेलंच नसतं. ज्योतिषशास्त्र सांगते की, तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव व बुद्धिमत्तेचा सुद्धा अंदाज येतो आणि म्हणूनच काही अशा राशी आहेत ज्या विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्यांसाठी अधिक योग्य व पात्र ठरतात. अशा व्यक्तींनी जर त्या क्षेत्रात काम केले तर त्यांना केवळ मान सन्मानच नव्हे तर आर्थिक मिळकतही अधिक लाभते.

ज्योतिषविद्येचे अभ्यासक सांगतात की सहसा मिथुन व कन्या या दोन राशींच्या व्यक्तींना सर्वात उच्च पदावरील नोकरी मिळण्याची संकेत असतात. या दोन्ही राशींचा स्वामी हा बुध ग्रह आहे, बुध हा बुद्धीचे तत्व म्हणून ओळखला जातो. बुध ग्रह राशीत असणाऱ्या व्यक्तींना बुद्धी, वाणी, सौंदर्य व धन प्राप्तीचे वरदान असते. यामुळेच जेव्हा एखाद्याला अचानक मोठा आर्थिक लाभ होतो किंवा तोटा होतो तेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण तपासले जाते. तसेच आयुष्यातील महिलांसह तुमचे संबंध कसे असतील हे सुद्धा बुध ग्रहाची स्थिती पाहून ठरवले जाऊ शकते.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…

जर एखाद्याचा बुध कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी व बुद्धी असूनही वापर न झाल्याचे उदाहरण दिसून येते. अशा कोणत्या राशी आहेत ज्यांचा बुध ग्रह बलवान आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात नोकरी केल्यास अधिक फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊयात..

मकर, कुंभ आणि तूळ

मकर, कुंभ आणि तूळ राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या व्यक्ती निष्पक्ष असतात, तसेच बोलण्यात तरबेज असतात. उत्तम वक्तृत्व व निर्णय क्षमता असल्याने नेतृत्व हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. अशा व्यक्तींना बांधून ठेवणाऱ्या नोकरीपेक्षा जेव्हा स्वतःचे मत मांडण्याची नोकरी लाभेल तेव्हा अधिक प्रगती होऊ शकते.

  • कुंभ राशीच्या व्यक्ती या सृजनशील असतात त्यामुळे कला व मीडिया हे क्षेत्र त्यांना लाभदायी ठरू शकते.
  • तूळ राशीच्या व्यक्ती न्याय व राजकारणासाठी अधिक उचित ठरतात.
  • मकर राशीला क्रिएटिव्ह असूनही पडद्यामागे राहणे आवडते त्यामुळे लेखन, पटकथाकार किंवा अगदी रेडिओ जॉकी असे पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात.

Best Couple Matches Zodiac: तुमच्या राशीला कोणत्या राशीचा जोडीदार आहे परफेक्ट?

मेष, वृषभ व कर्क

चिकित्सक व व्यवस्थापनात तरबेज अशा राशींसाठी कोणते काम उचित आहे?

  • मेष राशीच्या व्यक्तींसाठी शिक्षण क्षेत्र उचित ठरते, ओघवती वक्तृत्वाची शैली व समजून सांगण्याचा स्वभाव त्यांना यात मदत करतो
  • वृषभ राशीसाठी तर्कशुद्ध व चिकित्सक कामे उत्तम ठरतात.
  • कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक व्यवस्थापन उत्तम जमते त्यामुळे मॅनेजमेंट व बँकिंग अशी नोकरी त्यांना लाभदायी ठरू शकते.

नववर्षात ‘या राशींचे नशीब चमकणार फक्त.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व मन ‘या’ व्यक्तींपासून जपून ठेवा

सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन

रिस्क घेण्याची सवय ते हळवेपणा असे गुण असणाऱ्या या राशींना कोणते काम फायदेशीर ठरते पाहा

  • सिंह रास ही रिस्क- टेकर म्हणजेच धोका पत्करण्यात तरबेज असते त्यामुळे शेअर मार्केट किंवा गुंतवणूक संबंधी कामात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.
  • धनु राशीच्या व्यक्ती या नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे विज्ञान किंवा इतर विषयातील संशोधनांची काम इया व्यक्तींसाठी उचित ठरू शकतात.
  • वृश्चिक राशीच्या व्यक्ती या नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यासाठी अधिक उचित ठरतात.
  • मीन राशीच्या व्यक्तींसाठी राजनीती व न्याय क्षेत्र फायदेशीर ठरू शकते. मात्र तिथे हळवेपणा हा मूळ गुण थोडा जपून दाखवावा लागेल.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)