Venus Transit 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो आणि ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे किंवा गोचरमुळे राशीचक्रातील इतर राशींवर त्याचा थेट परिणाम दिसून येतो. शुक्र ग्रह हा प्रेम, सुख समृद्धीचा कारक मानला जातो. शुक्र ग्रहाने १९ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. शु्क्राचा हा गोचर अत्यंत खास असणार असून यामुळे वृषभ राशीमध्ये सूर्य, गुरू आणि शुक्राची युती निर्माण होत आहे. त्याचबरोबर शुक्र आणि गुरू मिळून शुक्रादित्य योग निर्माण करत आहे. शुक्र गोचर काही राशींसाठी लाभदायक आणि शुभ ठरणार आहे. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी शु्क्राचे गोचर चांगले नाही. या दरम्यान त्या राशींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यांच्या उत्पन्नावर आणि नातेंसंंबंधावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊ या शुक्र गोचरमुळे कोणत्या राशींचे नुकसान होऊ शकते. (shukra gochar in vrushabh rashi)

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुक्र गोचर नकारात्मक परिणाम देऊ शकतात. या लोकांना सुख सुविधा नीट मिळणार नाही. धावपळ आणि संघर्ष दिसून येईल. मानसिक अस्वस्थता दिसून येईल. याचा थेट परिणाम या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय वाईट ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात सुद्धा समस्या येऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते.

हेही वाचा : Mars Transit 2024: १ जूनपासून ‘या’ चार राशींवर पडेल पैशांचा पाऊस, मंगळ गोचरमुळे मिळेल बक्कळ पैसा

कन्या राशी –

शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांवर अडचणी येऊ शकतात. कोणत्याही कामात अपयश येऊ शकते. घरी नाराजीचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी समस्या जाणवतील. या लोकांना काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. प्रवासाचा योग जुळून येईल पण प्रवास करताना काळजी घ्यावी. या काळात या राशींना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

धनु राशी –

शुक्राचे राशी परिवर्तन प्रगतीमध्ये अडचणी आणू शकतात. हे लोक हाती आलेल्या संधी गमावू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. स्पर्धा वाढू शकतात. विरोधक या लोकांना त्रास देऊ शकतो. या लोकांचा खर्च वाढेल. आर्थिक समस्या वाढू शकतात. घरी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात. जोडीदाराबरोबर वादविवाद होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)