Shukra Nakshatra Gochar 2024 : शुक्राचे गोचर करणार आहे आणि आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्र हा सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य, सुखी वैवाहिक जीवन आणि सन्मानाचा कारक आहे. १२ जून रोजी शुक्राचे गोचर होऊन मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता १८ जून २०२४ रोजी शुक्र नक्षत्राचे प्रवेश होत आहे. शुक्र नक्षत्र बदलून आद्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. २९ जूनपर्यंत शुक्र आद्रा नक्षत्रात राहील. शुक्र आद्रा नक्षत्रात प्रवेश करताच सर्व राशींच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव पडेल. काही राशींना जबरदस्त लाभ मिळेल. त्यांचे आर्थिक संकट दूर होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. शुक्राचा अर्द्रा नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडेल ते जाणून घेऊया.

शुक्र नक्षत्र गोचरचा राशींवर प्रभाव

मेष: मेष राशीच्या लोकांना शुक्राच्या राशीत बदलामुळे खूप फायदा होईल. व्यवसायात लाभ होईल. संपत्ती वाढेल. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. सुख-सुविधा वाढतील. वैवाहिक जीवनातील तणाव संपेल. लव्ह लाईफ चांगली राहील.

हेही वाचा – जुलै महिन्यात २ वेळा शुक्र बदलणार राशी, या राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य, नवी नोकरीसह धनलाभ होण्याची शक्यता…

सिंह : शुक्राचे गोचर सिंह राशीच्या लोकांनाही भरपूर लाभ देईल. आतापर्यंत जे अडथळे होते ते आता दूर होतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. एकूणच, काळ चांगला आहे.

तूळ : आद्रा नक्षत्रात शुक्राचा प्रवेश तूळ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ देईल. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळतील. अडकलेला पैसा मिळेल. तुमची बँक बॅलन्स वाढेल. उत्पन्न वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे. व्यवसाय चांगला चालेल.

हेही वाचा – ३६५ दिवसांनी ‘बुधादित्य राजयोग’ घडून आल्याने ‘या’ राशींच्या दारी सोनपावलांनी येणार लक्ष्मी? घरात येऊ शकतो चांगला पैसा

मकर : आर्द्रा नक्षत्रात शुक्राचा प्रवेश मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरेल. धन, सुख, समृद्धी वाढेल. आर्थिक लाभ होईल. नात्यातील कटुता दूर होईल. घरात सुख-शांती नांदेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. प्रगतीची संधी मिळेल.