Venus-ketu Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. भौतिक सुख, संपत्ती, ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र लवकरच सिंह राशीतून कन्या राशीत राशी परिवर्तन करणार आहे. तसेच कन्या राशीत आधीपासून केतू ग्रह विराजमान आहे. शुक्राच्या कन्या राशीतील राशी परिवर्तनाने या राशीत शुक्र आणि केतूची युती निर्माण होईल.

पंचांगानुसार, २५ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह सिंह राशीतून दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करील आणि १७ सप्टेंबरपर्यंत शुक्र याच राशीत राहील. त्यामुळे शुक्र आणि केतू ग्रह एकत्र येतील. या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने काही राशीधारकांना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

शुक्र-केतूची युती करणार मालामाल (Venus-ketu Yuti 2024)

कन्या

शुक्र-केतूची युती कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. जोडीदारासोबतचे संबंध मजबूत होतील. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल, कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. व्यवसायात प्रगती होईल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. फिरायला जायचा प्लान कराल.

धनू

शुक्र-केतूची युती धनू राशीच्या व्यक्तींनादेखील अनेक सकारात्मक परिणाम देणारी ठरेल. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, कर्जमुक्ती होण्यात मदत होईल. धनप्राप्ती होईल. वैवाहिक आयुष्यात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. भाग्याची साथ मिळेल, कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: पुढचे २३० दिवस शनीची कृपा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद अन् प्रतिष्ठा

मकर

शुक्र-केतूच्या एकत्र येण्याने मकर राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी सहज दूर होतील. करिअरमध्ये मेहनतीच्या जोरावर यश मिळवाल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. धन, सुख-समृद्धीत वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. दूरचे प्रवास घडतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)