Venus Transit In Libra 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम आणि कला यांच्याशी संबंधित असलेला शुक्र ग्रह स्वत:च्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राचे स्वत:च्या राशीतील गोचर अत्यंत शुभ मानले जाते. या गोचराचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. मात्र तूळ, कर्क, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या, व्यवसायात विस्तार, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. तु्म्ही लहान किंवा लांबच्या यात्रा देखील करू शकता.

शुक्राचा तूळ राशीतील प्रवेश विशेष का आहे?

जेव्हा शुक्र स्वत:च्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे शुभ फळ अनेक पटींनी वाढते. तूळ राशी ही संतुलन, भागीदारी, सौंदर्य, व्यवसाय आणि सामाजिक संबंधांची राशी मानली जाते. त्यामुळे हे संक्रमण व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक, भागीदारी, कला, संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांमधील व्यक्तींसाठी सकारात्मक परिणाम आणू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांनाही गती मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ ४ राशींवर सर्वात शुभ प्रभाव

तूळ राशी

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल.

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता, वाहने किंवा घरगुती सुविधांशी संबंधित बाबींमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण त्यांच्या कार्यक्षेत्रात यश आणू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन ग्राहक आणि चांगल्या नफ्याच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी हे संक्रमण भाग्य घेऊन येऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. परदेश प्रवास किंवा लांबच्या प्रवासाशी संबंधित प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयार करणाऱ्यांनाही शुभ परिणाम मिळू शकतात.