ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या संक्रमण झाल्यानंतर त्या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. शुक्र ग्रह राशी बदलणार आहे. ऐश्वर्य आणि संपत्ती देणारा शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण ३१ मार्च रोजी होणार असूनव याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो.

मेष: धनदाता शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र तुमच्या अकराव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला ज्योतिषशास्त्रात उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते.या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच शुक्र तुमच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. व्यवसायात जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. या काळात तुम्ही बिझनेस ट्रिपलाही जाऊ शकता.

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

मकर: शुक्राचे संक्रमण तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात असेल. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते मिळू शकतात. वेतनवाढ प्रलंबित असेल त्यांना यावेळी वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्रदेव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

ग्रहांचा राजा सूर्यदेव ३० दिवस राहणार मित्रराशीत, ‘या’ तीन राशींना धनलाभाचा योग

कुंभ: शुक्राचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र देखील त्रिकोण आणि केंद्राचा स्वामी आहे. शुक्राचे तुमच्याच राशीतून भ्रमण होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्याशी मैत्रीपूर्ण वागतील. यावेळी तुमची आर्थिक बाजूही मजबूत असेल. प्रॉपर्टी डीलर, रिअल इस्टेट एजंट, ट्रॅव्हल एजंट आणि ऑटोमोबाईल व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायात या काळात नवीन करार निश्चित होऊ शकतो. कुंभ ही शनिदेवांची रास असून ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि शनिदेव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.