ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा धन, सुख आणि प्रेमाचा ग्रह आहे. शुक्राचे संक्रमण या सर्व पैलूंवर परिणाम करते. जर कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागतो, त्याचे प्रेम जीवन नीरस राहते. वैवाहिक जीवनात अडचणी येतात. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र सध्या मीन राशीत आहे आणि आज म्हणजेच २३ मे २०२२ रोजी रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर १८ जून २०२२ पर्यंत या राशीत राहील. या दरम्यान, त्यांचा ५ राशींच्या वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया या ५ राशी कोणत्या आहेत.

  • कर्क

कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जीवनसाथीसोबतही वाद होऊ शकतो. यावेळी संयमाने वागणे आणि वादविवाद टाळणे चांगले.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

खूपच आकर्षक असतात ‘या’ राशीची मुलं; पहिल्या भेटीतच लोकं होतात प्रभावित

  • कन्या

कन्या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ ठीक राहील. यासोबतच नात्यांबाबतही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरात पालकांशी वाद होऊ शकतो. जीवनसाथी आणि सासरच्या लोकांशीही संबंध बिघडू शकतात. प्रकरण जास्त वाढणार नाही याची काळजी घ्या.

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. शत्रू हानी करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही प्रवासाला जाऊ शकता, परंतु यामुळे लाभ होण्याची शक्यता नगण्य असेल. जोडीदाराशी संभाषण करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा वादविवाद होऊ शकतात. व्यापाऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात.

घरामध्ये ‘हे’ संकेत दिसणे असते खूपच शुभ; लवकरच होऊ शकते धनप्राप्ती

  • धनु

धनु राशीच्या लोकांना वैयक्तिक आयुष्यात नुकसान होऊ शकते. जीवनसाथीसोबत वादामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ नाजूक असल्याने काळजी घ्या.

  • मीन

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण जाईल. प्रतिमा खराब होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब करण्याचा शत्रू सर्वतोपरी प्रयत्न करतील. कुटुंबातही मतभेद होऊ शकतात. एखादा सदस्य आजारी पडू शकतो. आर्थिक नियोजन करा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)