Venus Transit in Pisces : वैदिक ज्योतिषानुसार शुक्र ग्रह सुमारे एका महिन्याच्या कालावधीनंतर राशी बदलतो. सौंदर्य, सुख, ऐश्वर्य, वैभव आणि संपत्तीचा कारक असलेला शुक्र मार्च महिन्यात आपल्या उच्च राशी मीनमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र मीन राशीत उच्चस्थानी असताना केंद्र स्थानाशी संयोग साधल्यास मालव्य महापुरुष राजयोग तयार होतो. हा योग वैभव, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि जीवनातील सुखसोयी वाढवणारा मानला जातो. त्यामुळे या काळात काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची दाट शक्यता आहे.
कर्क राशीवर शुक्राचा प्रभाव (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा कालावधी विशेष लाभदायक ठरू शकतो. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीतील नवव्या भावात संचार करणार असल्याने भाग्यवृद्धीचे संकेत मिळतात. या काळात धर्म, अध्यात्म आणि सत्कर्माकडे तुमचा कल वाढू शकतो. उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील, तसेच जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. काही लोकांसाठी परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. वडीलधारी व्यक्ती किंवा गुरूंचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभदायक ठरेल.
मिथुन राशीसाठी करिअरची संधी (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मालव्य महापुरुष राजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. हा योग तुमच्या कर्मभावात सक्रिय होत असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतात. नोकरी करणार्यांना पदोन्नती, मान-सन्मान किंवा वेतनवाढीचा आनंद मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदार्या वाढतील, मात्र त्यातूनच पुढील प्रगतीचा मार्ग खुला होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन करार, व्यवहार किंवा महत्त्वाच्या डील अंतिम टप्प्यात पोहोचू शकतात, ज्यातून आर्थिक स्थैर्य मिळेल.
मीन राशींसाठी व्यक्तिमत्वात नवा उजाळा (Pisces Zodiac)
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत सकारात्मक मानला जात आहे, कारण शुक्र तुमच्या लग्न भावात संचार करणार आहे. यामुळे व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखकर राहील, तसेच वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे योग जुळून येऊ शकतात. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता असून काम करण्याची शैली अधिक प्रभावी बनेल. एकूणच या काळात मीन राशीच्या लोकांना आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ अनुभवता येऊ शकतो.
