Rashi Bhavishya 17 July 2026 In Marathi : आज १७ जुलै २०२६ रोजी कृष्ण पक्षातील आषाढ महिन्यातील चतुर्थी तिथी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी सुरु होणार आहे. आज मघा नक्षत्र जागृत असेल आणि त्याचबरोबर व्यतिपात योग जुळून येत आहेत. राहू काळ १० वाजून ४४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त ११ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी असणार आहे; तर तुमच्यासाठी बाप्पा कोणता खास संदेश घेऊन आले आहेत चला जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १७ जुलै २०२६ (Dainik Rashi Bhavishya 17 July 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

मनात हेतु ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर