scorecardresearch

Vinayak Chaturthi: ३ जून रोजी विनायक चतुर्थी साजरी होणार; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. ही चतुर्थी दर महिन्याला साजरी होत असल्याने यानिमित्ताने श्रीगणेशाच्या अनेक रूपांची पूजा केली जाते.

Vinayaka-Chaturthi-2022

Vinayak Chaturthi June 2022: दर महिन्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. ही चतुर्थी दर महिन्याला साजरी होत असल्याने यानिमित्ताने श्रीगणेशाच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. याला संकट हार, अंगारकी चतुर्थी आणि गणेश चतुर्थी इत्यादी नावाने देखील ओळखले जाते.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त
गणपतीची सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कधीही पूजा करता येते. मात्र गणेश-चतुर्थीच्या दिवशी दुपारची वेळ गणेशपूजेसाठी उत्तम मानली जाते. दुपारच्या गणेश पूजेच्या वेळेला विनायक चतुर्थीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त मानतात. पंचांगानुसार, चतुर्थी तिथी शुक्रवार, ३ जून रोजी सकाळी १०.५६ वाजता सुरू होईल. ही तिथी ४ जून रोजी दुपारी ०१.४३ वाजता समाप्त होईल.

आणखी वाचा : ५ जूनपासून या ३ राशींवर होणार शनिदेवाची कृपा, जाणून घ्या यात तुमची राशी आहे का?

विनायक चतुर्थीचा शुभ योग
हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्थीच्या दिवशी वृद्धी, ध्रुव, सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहेत. हे योग शास्त्रात अतिशय शुभ मानले गेले आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०५.२३ ते संध्याकाळी ०७.०५ पर्यंत राहील.

उपासना: विनायक गणेश चतुर्थी ही गणपतीचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. व्रत करणाऱ्या भाविकांनी सकाळी स्नान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. पूजेच्या वेळी फळे आणि फुले अर्पण करा आणि गणेशाची पूजा करा. गणेशाला मोदक अर्पण करा. सर्व विधींसह पूजा केल्यानंतर ओम गणेशाय नमः या गणेश मंत्राचा जप करावा. हा जप १०८ वेळा करा.

आणखी वाचा : June Month 2022: ज्येष्ठ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू, या दिवसात चुकूनही करू नका ‘हे’ काम!

विनायक चतुर्थी व्रत फार कठीण आहे. या व्रतामध्ये फक्त फळांचे सेवन केले जाऊ शकते. याशिवाय शेंगदाणे, साबुदाणा वगैरेही खाता येतात. चंद्राला पाहून हे व्रत सोडतात. या दिवशी व्रत ठेवल्यास श्रीगणेशाची कथा अवश्य ऐका. असे केल्यानेच तुमची उपासना सफल होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2022 at 20:36 IST