Vivah Muhurat Weding Dates 2025: हिंदू विधींमध्ये विवाह खूप महत्त्वाचा आणि पवित्र विधी मानला जातो. वैदिक शास्त्रानुसार, विवाह हे एक पवित्र नाते असून, ते शुभ मुहूर्तावरच झाले पाहिजे. सर्व शुभ कार्यांसाठी जसे शुभ मुहूर्त अन् वेळ व तारीख असते. तसेच लग्नासाठीही शुभ मुहूर्त आणि तारीख असते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी शुभ वेळ आणि तारीख निश्चित करणे महत्त्वाचे आहे. कारण- विवाह म्हणजे एक मिलन आहे; जे दोन व्यक्तींना, तसेच दोन कुटुंबांना एकमेकांशी जोडते आणि आयुष्यभराच्या सुंदर नात्यात बांधते. त्यामुळे कुंडली जुळण्याबरोबर लग्नाच्या शुभ तारखा आधी पाहिल्या जातात. दरम्यान, तुम्ही २०२५ मध्ये लग्न करण्यासाठी योग्य मुहूर्त आणि योग्य वेळ शोधत आहात का? तर, आम्ही तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर २०२५ पर्यंतचे शुभ विवाह मुहूर्तांची यादी देत आहेत, त्यानुसार तुम्ही लग्नाचे पुढील नियोजन करू शकता.

लग्नासाठी शुभ मुहूर्त २०२५ (Vivah Muhurat 2025 Hindu Wedding Dates from January 2025 to December 2025)

२०२५ मध्ये तुम्ही लग्नासारख्या महत्त्वाच्या कार्यासाठी अनेक शुभ मुहूर्त निवडू शकता. आम्ही तुमच्यासाठी हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२५ मधील लग्नासाठीचे शुभ मुहूर्त घेऊन आलो आहोत; जेणेकरून तुमचे सर्व कार्य योग्य तारखांना चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता.

today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

जानेवारी २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त (Marriage Dates In January 2025 )

जर तुम्हाला हिवाळ्यात लग्न करायचे असेल, तर तुमच्यासाठी लग्नाच्या शुभ तारखा निवडण्यासाठी जानेवारी हा सर्वांत चांगला महिना असू शकतो. या जानेवारी महिन्यात लग्नासाठी १० शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार जानेवारी २०२५ मध्ये १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४, २६ व २७ या १० तारखा विवाह सोहळ्यासाठी सर्वांत शुभ मानल्या जातात.

जानेवारी महिन्यातील लग्नासाठीचे १० शुभ मुहूर्त (January 2025 Vivah Muhurat )

तारीखवार
१६ जानेवारी २०२५गुरुवार
१७ जानेवारी २०२५शुक्रवार
१८ जानेवारी २०२५शनिवार
१९ जानेवारी २०२५रविवार
२० जानेवारी २०२५सोमवार
२१ जानेवारी २०२५,मंगळवार
२३ जानेवारी २०२५गुरुवार
२४ जानेवारी २०२५, शुक्रवार
२६ जानेवारी २०२५रविवार
२७ जानेवारी २०२५सोमवार

फेब्रुवारी २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त (Marriage Dates In January 2025 )

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटले जाते. कारण- या महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्यामुळे अनेक जण १४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण, या महिन्यात लग्नासाठी इतरही अनेक शुभ मुहूर्त आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार फेब्रुवारी २०२५ मध्ये २, ३, ६, ७, १२, १३, १४, १५, १८, १९, २१, २३ व २५ हे दिवस लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.

फेब्रुवारी महिन्यातील लग्नासाठीचे १४ शुभ मुहूर्त (February 2025 Vivah Muhurat )

२ फेब्रुवारी २०२५, रविवार
३ फेब्रुवारी २०२५, सोमवार
६ फेब्रुवारी २०२५, गुरुवार
७ फेब्रुवारी २०२५, शुक्रवार

१२ फेब्रुवारी २०२५, बुधवार
१३ फेब्रुवारी २०२५, गुरुवार
१४ फेब्रुवारी २०२५, शुक्रवार
१५ फेब्रुवारी २०२५, शनिवार

१६ फेब्रुवारी २०२५, रविवार
१८ फेब्रुवारी २०२५, मंगळवार
१९ फेब्रुवारी २०२५, बुधवार
२१ फेब्रुवारी २०२५, शुक्रवार
२३ फेब्रुवारी २०२५, रविवार
२५ फेब्रुवारी २०२५, मंगळवार

२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन

मार्च २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त (Marriage Dates In March 2025 )

मार्च हा विवाहसोहळ्यांसाठी एक विशेष महिना मानला जातो. या महिन्यात लग्नाच्या तारखा निवडून, तुम्ही तुमच्या लग्नाचे नियोजन करू शकता. मार्च २०२५ मध्ये लग्नासाठी पाच शुभ मुहूर्त आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार, , २, ६, ७ १२ व १३ मार्च २०२५ हे लग्न समारंभांसाठी शुभ मानले जातात.

मार्च महिन्यात लग्नासाठी ५ शुभ मुहूर्त (March 2025 Vivah Muhurat )

२ मार्च २०२५, रविवार
६ मार्च २०२५, गुरुवार
७ मार्च २०२५, शुक्रवार
१२ मार्च २०२५, बुधवार
१३ मार्च २०२५, गुरुवार

एप्रिल २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

मार्चप्रमाणे एप्रिल महिन्यातही अनेक जण लग्नाचा मुहूर्त ठरवतात. कारण- मे महिन्याच्या तुलनेत या महिन्यात उकाडा तुलनेने कमी असतो. त्याशिवाय या महिन्यापासून सुट्या सुरू होतात. त्यामुळे सुट्यांचे नियोजन पाहून अनेक जण लग्नाचा मुहूर्त ठरवतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार एप्रिल २०२५ मध्ये लग्नाचे नऊ मुहूर्त आहेत. १४, १६, १७, १८, १९, २०, २१, २५, २९ व ३० या तारखांना विवाह सोहळ्यासाठी विशेष महत्त्व आहे.

एप्रिल महिन्यात लग्नासाठी ९ शुभ मुहूर्त

१४ एप्रिल २०२५, सोमवार
१६ एप्रिल २०२५, बुधवार
१७ एप्रिल २०२५, गुरुवार
१८ एप्रिल २०२५, शुक्रवार
१९ एप्रिल २०२५, शनिवार
२० एप्रिल २०२५, रविवार
२१ एप्रिल २०२५, सोमवार
२५ एप्रिल २०२५, शुक्रवार
२९ एप्रिल २०२५, मंगळवार
३० एप्रिल २०२५, बुधवार

मे २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्याने अनेक कुटुंबांत लग्नासाठी हा महिना निवडला जातो. कारण- यानिमित्ताने कुटुंबातील सर्वांना लग्नकार्यात सहभागी होता येईल, असा उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, महाराष्ट्रात मे महिन्यात सर्वाधिक विवाहसोहळे पार पडतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार मे महिन्यात विवाह सोहळ्यासाठी १५ शुभ तारखा आहेत. मे २०२५ मध्ये १, ५, ६, ८, १०, १४, १५, १६, १७, १८, २२, २३, २४, २७ व २८ या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

मे महिन्यात लग्नासाठी १५ शुभ मुहूर्त

१ मे २०२५, गुरुवार
५ मे २०२५, सोमवार
६ मे २०२५, मंगळवार
८ मे २०२५, गुरुवार
१० मे २०२५, शनिवार
१४ मे २०२५, बुधवार
१५ मे २०२५, गुरुवार
१६ मे २०२५, शुक्रवार
१७ मे २०२५, शनिवार
१८ मे २०२५, रविवार
२२ मे २०२५, गुरुवार
२३ मे २०२५, शुक्रवार
२४ मे २०२५, शनिवार
२७ मे २०२५, मंगळवार
२८ मे २०२५, बुधवार

जून २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

अनेक जण मे महिन्यातील उकाडा संपल्यानंतर म्हणजे जूनमध्ये लग्नाचा घाट घालतात. भले जूनपासून पाऊस सुरू होत नाही; पण उकाडा तरी काही प्रमाणात का होईना कमी झालेला असतो. त्यामुळे काही जण मे महिन्यापेक्षा जूनमध्ये लग्नाची तारीख ठरवतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, जूनमध्ये विवाह सोहळ्यासाठी पाच शुभ तारखा आहेत. जून २०२५ मध्ये २, ४, ५, ७ व ८ या तारखा लग्नकार्यासाठी शुभ आहेत.

जूनमध्ये लग्नासाठी पाच शुभ मुहूर्त

२ जून २०२५, सोमवार
४ जून २०२५, बुधवार
५ जून २०२५, गुरुवार
७ जून २०२५, शनिवार
८ जून २०२५, रविवार

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल नसते, तेव्हा लग्नाचे शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे २०२५ मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत नक्षत्रांची स्थिती योग्य नसल्यामुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीत.

नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

२०२५ मध्ये दिवाळी सण सप्टेंबर महिन्यात आहे आणि तो सण संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी काही खास मुहूर्त आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२५ मध्ये नोव्हेंबर महिन्यात १४ शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही २, ३, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, २१, २२, २३, २५ व ३० तारखेला लग्न समारंभ आयोजित करू शकता.

नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी १४ शुभ मुहूर्त

२ नोव्हेंबर २०२५, रविवार
३ नोव्हेंबर २०२५, सोमवार
६ नोव्हेंबर २०२५, गुरुवार
८ नोव्हेंबर २०२५, शनिवार
१२ नोव्हेंबर २०२५, बुधवार

१३ नोव्हेंबर २०२५, गुरुवार
१६ नोव्हेंबर २०२५, रविवार
१७ नोव्हेंबर २०२५, सोमवार
१८ नोव्हेंबर २०२५, मंगळवार
२१ नोव्हेंबर २०२५, शुक्रवार
२२ नोव्हेंबर २०२५, शनिवार
२३ नोव्हेंबर २०२५, रविवार
२५ नोव्हेंबर २०२५, मंगळवार
३० नोव्हेंबर २०२५, रविवार

डिसेंबर २०२५ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

सर्व सण-उत्सव संपल्यानंतर डिसेंबर महिना सुरू होतो. पण, या महिन्यातही अनेक जण ख्रिसमसच्या सुट्या लक्षात घेऊन विविध मनसुबे ठरवितात. त्यामुळे कुटुंबातील सुट्यांचे नियोजन लक्षात घेत, डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठरवला जातो. तसेच थंडीचे दिवस सुरू असतात. त्यामुळे हा काळ लग्नकार्यासाठी अनुकूल ठरतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबर २०२५ मध्ये ४, ५ व ६ डिसेंबर या तारखा लग्नकार्यासाठी शुभ आहेत.

डिसेंबरमध्ये लग्नासाठी तीन शुभ मुहूर्त

४ डिसेंबर २०२५, गुरुवार
५ डिसेंबर २०२५, शुक्रवार
६ डिसेंबर २०२५, शनिवार

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader