Vrun Graha Asta 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते, ज्यात वरूण (नेपच्यून) या ग्रहाचा समावेश नाही. परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरूण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते. या ग्रहाचा संबंध कल्पना, भ्रम आणि रहस्य या गोष्टींशी आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो. तसेच ज्या व्यक्तींवर वरूण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. परंतु जेव्हा वरूण ग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असते.
पंचांगानुसार, १२ मार्च २०२६ वरुण ग्रह अस्त होणार असून तब्बल २२ दिवस अस्त राहील आणि ०३ एप्रिल २०२६ रोजी उदित होईल. ज्याचा शुभ प्रभाव पैकी काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल.
वरुण ग्रहाची अस्त अवस्था ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींना अस्त वरुण लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी अस्त वरुण अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचे नशीब चमकेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कष्टाचे फळ मिळेल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. कामाच्या ठिकाणी उच्च पद प्राप्त होईल. आरोग्य समस्या दूर होतील. लग्नाचे प्रस्ताव येतील, अविवाहितांचे लग्न ठरू शकते. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील अस्त वरुण फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या नशीबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींवर देखील अस्त वरूण फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
