Vrun Graha Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते, ज्यात वरूण (नेपच्यून) या ग्रहाचा समावेश नाही. परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरूण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते. या ग्रहाचा संबंध कल्पना, भ्रम आणि रहस्य या गोष्टींशी आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो. तसेच ज्या व्यक्तींवर वरूण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. परंतु जेव्हा वरूण ग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असते.

पंचांगानुसार, ११ जून २०२६ रोजी दुपारी ०१ वाजून १९ मिनिटांनी वरुण ग्रह उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. वरुण ग्रहाचे हे गोचर १२ पैकी काही राशींसाठी लाभदायक सिद्ध होईल.

वरुण ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ राशींचे नशीब चमकवणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी वरुण ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी वरुण ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या नशीबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींवर देखील वरुण ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)