ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो किंवा उगवतो तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो. धनधान्य देणारा शुक्र २७ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख, वैवाहिक सुख, उपभोग-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लैंगिक लालसा आणि फॅशन-डिझाइनिंग इत्यादींचा कारक मानले जाते.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

मेष राशी

शुक्र तुमच्या राशीच्या दुसर्‍या आणि सातव्या घराचा स्वामी आहे आणि करिअर, नाव आणि प्रसिद्धीसाठी दहाव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे शुक्राच्या या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. तसेच, नवीन व्यवसाय भागीदारी तयार केली जाऊ शकते, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. यावेळी तुम्हाला सरकारी नोकरीही मिळू शकते.

वृषभ राशी

शुक्र तुमच्या राशीच्या पहिल्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि तो अध्यात्म, नशीब आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती मिळेल. यासोबतच तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला यशही मिळेल. यावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या व्यतिरिक्त, व्यावसायिक लोकांना या कालावधीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच प्रलंबित कामेही पूर्ण होतील. परदेशातूनही आर्थिक लाभ होऊ शकतो. स्पर्धक विद्यार्थ्यांनाही यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सरकारी नोकऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे.

धनू राशी

शुक्र तुमच्या राशीच्या सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी असून धनसंचय, कुटुंब आणि वाणीच्या दुसऱ्या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे या संक्रमण काळात तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल तसेच तुमच्या आरोग्यातही सकारात्मक सुधारणा दिसून येईल. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्य होऊ शकते. या दरम्यान, तुमची संभाषण शैली देखील छान असेल. यासोबतच यावेळी तुम्हाला अडकलेले पैसेही मिळतील. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.

मीन राशी

तुमच्या संक्रमण कुंडलीच्या तिसर्‍या आणि आठव्या घराचा स्वामी शुक्र आहे आणि तो लाभ आणि इच्छेच्या अकराव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे शुक्राचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल कारण या काळात तुम्हाला व्यावसायिक जीवनात यश मिळेल. तसेच उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. भाऊ बहिणीचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, या काळात तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल.