21st February Horoscope Marathi: बुधवार, २१ फेब्रुवारी : आजचा दिवस शुभ असून काही राशींना आज त्यांच्या कष्टाचे चांगले फळ मिळणार आहे. तर काहींच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतील. तुमच्या कुंडिलीचे ग्रहमान कसे असेल पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-किरकोळ जखमा होऊ शकतात. हित शत्रूंचा त्रास जाणवू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होतील. नवीन मित्र जोडाल. मानापमानाचे प्रसंग येवू शकतात.

वृषभ:-गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. जोडीदाराशी वाद संभवतात. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मिथुन:-छुप्या शत्रूंवर विजय मिळवू शकाल. हातातील कामात यश येईल. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. नातेवाईकांना त्रास होण्याची शक्यता आहे.

कर्क:-मुलांच्या स्वतंत्रवृत्तीत वाढ होईल. पोटाची काळजी घ्यावी. बौद्धिक ताण जाणवेल. सट्टा, जुगार यांपासुन दूर राहावे. मुलांशी जुळवून घ्यावे.

सिंह:-कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. शेतीतील मालाची योग्य जपणूक करावी.

हेही वाचा : Mahashivratri 2024: महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी

कन्या:-न डगमगता कामे करावीत. हटवादीपणा करू नये. टीकेला सामोरे जावे लागेल. वैचारिक मतभेद राहतील. परिस्थितीशी जुळवून घ्यावे.

तूळ:-धडपड करून कामे मिळवाल. खर्च करतांना विचार करावा. स्वभावात उतावीळपणा येईल. बोलतांना सारासार भान राखावे. वादात भाग घेणे टाळावे.

वृश्चिक:-तुमची दगदग वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. पित्तविकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद वाढू शकतात. हातातील कामावर लक्ष द्यावे.

धनू:-खर्च वाढू शकतात. जुन्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. कोर्ट-कचेरीची कामे रेंगाळतील. मानसिक स्वास्थ जपावे. आर्थिक प्रकरणात जपून राहावे.

मकर:-कष्ट काहीसे वाढू शकतात. घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस खटपट करण्यात जाईल.

कुंभ:-कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. तुमच्या विरोधकांचा त्रास वाढू शकतो. आपली पत सांभाळावी. कामाच्या ठिकाणी नवीन बदल घडून येतील. व्यावसायिकांनी अडचणीतून मार्ग काढावा.

मीन:-प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो. स्वकष्टावर भर द्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wednesday 21st february panchang daily horoscope mesh to meen rashi bhavishya some people will get rewarded for their hard work dha
First published on: 20-02-2024 at 19:00 IST