scorecardresearch

पुढील ७ दिवस ‘या’ राशींचे ग्रह होणार बुलंद! गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीला ‘या’ रूपात होऊ शकतो बक्कळ धनलाभ

Weekly Horoscope 20th to 26th March; चैत्र नवरात्री, गुढीपाडवा या दोन्ही महत्त्वाच्या तिथी २२ मार्च म्हणजेच आठवड्याच्या मध्यात सुरु होत आहेत. १२ राशींपैकी तुमच्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव नेमका कसा असणार हे पाहूया..

Weekly Horoscope 12 Zodiac Signs Rashibhavishya Who Shani Power Gudhipadwa Chaitra Navratri Will Give Money
२० ते २६ मार्च आठवड्याचे १२ राशीभविष्य (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Saptahik Rashifal March 2023: मार्च महिन्यातील सर्वात शुभ व पवित्र आठवडा उद्यापासून सुरु होत आहे. या आठवड्यात हिंदू धर्मीयांसाठी पवित्र चैत्र मास सुरु होत आहे. चैत्र नवरात्री, गुढीपाडवा या दोन्ही महत्त्वाच्या तिथी २२ मार्च म्हणजेच आठवड्याच्या मध्यात सुरु होत आहेत. २७ मार्चला उदय होण्यासाठी याच आठवड्यात ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह सज्ज होणार आहेत. तर दुसरीकडे १८ मार्च पासून शनिदेव सुद्धा सूर्यासह युती संपवून पॉवरफुल मोड मध्ये आले आहेत. या शुभ तिथी व ग्रहस्थितीनुसार १२ राशींच्या कुंडलीत मोठे व महत्त्वाचे बदल घडू शकतात. १२ राशींपैकी तुमच्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव नेमका कसा असणार हे पाहूया..

२० ते २६ मार्च २०२३ चा आठवडा १२ राशींसाठी कसा जाणार? (Weekly Horoscope)

मेष (Aries Zodiac)

मेष राशीसाठी येणारा आठवडा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्याला अनपेक्षित पदोन्नती मिळू शकते यामुळे पगारवाढीचा व परिणामी धनलाभाचे योग्य आहेत. तुम्हाला आरोग्याची खास काळजी घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीसाठी २६ मार्चपर्यंतचा काळ काहीसा तणावपूर्वक ठरू शकतो. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीचा योग आहे, अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कौटुंबिक सुखाने तुमचा ताण दूर होऊ शकतो.

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीसाठी यंदाचा आठवडा विजयाची सुरुवात ठरू शकतो. आयुष्यात यशाचे नवे दार उघडू शकते. तुम्हाला याकाळात महत्त्वपूर्ण संपर्क साधता येतील ज्याचा भविष्यात प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या मंडळींना या आठवड्यात आपल्या व्यक्तिमत्वावर काम करावे लागू शकते, पण तुमचे अचूक निर्णय तुमची लोकप्रियता व भविष्य योग्य दिशेत नेऊ शकतात. तुम्हाला परदेश प्रवासाचे योग आहेत.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या मंडळींना या आठवड्यात प्रचंड खर्च करावा लागू शकतो ज्यामुळे तुमचे बजेट बिघडण्याची सुद्धा चिन्हे आहेत, पण तुम्हाला शक्य होईल तशी इतरांना मदत करायला हवी. तुम्हाला अनोळखी मंडळींकडूनच भविष्यात अनपेक्षित मदत होऊ शकते.

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या मंडळींना प्रगतीचे योग आहेत. तुम्हाला एकांतात अधिक शांती व आनंद अनुभवता येऊ शकतो. तुमचा आठवडा नव्या ऊर्जेने भरलेला असेल.

तूळ (Libra Zofdiac)

तूळ राशीच्या मंडळींसाठी येणारा आठवडा काही नव्या संधी घेऊन येऊ शकतात. तुमच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचा प्रभाव वाढू शकतो. आध्यात्मिक उन्नत्तीचे योग आहेत. नोकरी बदलण्याची संधी येऊ शकते.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या मंडळींना येणारा आठवडा तुमच्यासाठी उन- सावलीचा असणार आहे. नोकरदारांना आर्थिक मिळकतीचे बाह्य स्रोत मिळू शकतात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीचे योग आहेत.

धनु (Sagittarius Zodiac)

आठवड्याच्या सरतेशेवटी आर्थिक लाभाचे योग आहेत. कोर्टाचे खटले तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या लहानसहान तक्रारी येऊ शकतात मात्र जोडीदाराच्या साथीने तुम्ही आनंदी राहू शकाल.

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या विद्यार्थ्यांना प्रगतीचे योग आहेत. इंटर्नशिप किंवा पार्ट टाइम कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शिक्षण, बँकिंग व मीडिया क्षेत्रातील प्रगतीच्या संधी आहेत.

कुंभ (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गुढीपाडव्याला सूर्यदेवाच्या आशीर्वादाने खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. नवीन नोकरी शोधत असल्यास हा आठवडा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो.

हे ही वाचा<< २७ मार्च २०२३ पासून ‘या’ तीन राशींचे अच्छे दिन होणार सुरु? बुधलक्ष्मी देऊ शकते अमाप धनलाभ व प्रेम

मीन (Pisces Zodiac)

संतती सुखाचे योग आहेत, अडकून राहिलेल्या कामात जोर लावण्याची गरज आहे. आर्थिक जबाबदारी वाढू शकते. जोडीदारांच्या इच्छांचा आदर न ठेवल्यास भांडण होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 13:14 IST
ताज्या बातम्या