Weekly Horoscope 3 to 9 August 2026: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा खूप विशेष मानला जातो. या आठवड्यात अनेक ग्रहांची स्थिती बदलत आहे, त्यामुळे १२ राशींमध्येही बदल घडून येतात. हा आठवडा सुरू होण्यापूर्वी शुक्र कन्या राशीत, मंगळ मिथुन राशीत, राहू धनिष्ठा नक्षत्रात आणि केतू मघा नक्षत्रात प्रवेश करेल. या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच ३ ते ९ ऑगस्ट २०२६दरम्यान गुरू पुष्य नक्षत्रात बुध ५ ऑगस्ट रोजी कर्क राशीत आणि बुध ८ ऑगस्ट रोजी पुन्हा पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. तसंच गुरू आणि सर्य कर्क राशीतच राहतील. शनी मीन राशीत वक्री होईल आणि केतू सिंह राशीत असेल. ज्योतिषशास्त्राच्या मते, हा आठवडा अनेक राशींच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करू शकतो. परिणामी काही राशींच्या लोकांना विवाह, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, मूल, परदेश प्रवास किंवा एकूणच आयुष्यात परिणाम जाणवू शकतात. तर मग जाणून घेऊया १२ राशींसाठी हा आठवडा कसा असेल…
मेष राशी
हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन येऊ शकतो. या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असू शकतो. पदोन्नती, वेतनवाढ आणि पगारवाढीची दाट शक्यता आहे. तसंच तुम्ही नवीन व्यवसायाची सुरूवात करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल असेल. बराच काळ अडकलेल्या कामांना वेग येईल. सामाजिक सन्मान वाढेल, तर नवीन मैत्री, नवीन नातेसंबंध आणि विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी शुभ संधी निर्माण होत आहेत. अविवाहित व्यक्तींनाही प्रेमसंबंधांचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र परिणामांचा ठरेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंचम स्थानातील शुक्र क्रिएटिव्हिटी, कला, प्रेम आणि आकर्षण वाढवेल. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह कामात व्यस्त राहाल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. व्यवसायात, रखडलेले कोणतेही व्यवहार किंवा योजना पुढे सरकू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल.
मिथुन राशी
मिथुन राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असेल. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यास मदत होईल. तुमची वाणी आणि क्रिएटिव्हिटी फायदेशीर ठरेल. प्रवासाची दाट शक्यता असून तो फायदेशीरही ठरेल. नोकरी आणि व्यवसायातून फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळवाल. हा आठवडा नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसंच आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
कर्क राशी
हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या शुब असेल. नोकरदार व्यक्तींना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. पदोन्नती आणि पगारवाढीसाठी हा काळ अनुकूल असेल. तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळू शकते. कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांकडून भरपूर पाठिंबा मिळेल. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा, पालकांचा किंवा विश्वासू मित्राचा सल्ला घ्या. मात्र वाहनांच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रगती घेऊन येईल. येणारा काळ नवीन सुरूवात आणि प्रगती दर्शवतो. जीवनातील मोठ्या उपक्रमांना गती मिळू शकते आणि प्रगतीच्या अनपेक्षित संधी निर्माण होऊ शकतात. हा आठवडा तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी उत्कृष्ट संधी देईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल आणि तुम्ही दोघे मिळून व्यवसायात किंवा इतर क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकता. आर्थिक बाबी, मुलांशी संबंधित प्रकरणे आणि परराष्ट्र व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगा. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही मतभेद किंवा वाद निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
कन्य राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असेल. तुमचा सामाजिक दर्जा आणि आदर वाढेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील आणि तुमच्या सूचना स्वीकारतील. नोकरी करणाऱ्यांना बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अपत्यप्राप्ती किंवा लग्न यासारख्या गोष्टींत संयम बाळगा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्तार आणि नवीन प्रयोगांसाठी देखील अनुकूल असेल. व्यवसायाति नवीन योजना राबवणे किंवा नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, तुमच्या वडिलांकडून मिळणारा पाठिंबा मर्यादित असू शकतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मालमत्ता आणि वाहनांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप मेहनतीचा असेल. तुमच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहे. शुक्राच्या प्रभावामुळे अनेक रखडलेली कामे पुन्हा वेग धरू शकतात. परराष्ट्र व्यवहार, सरकारी कामकाज आणि प्रलंबित कागदपत्रांमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्ही जितके जास्त काम कराल, तितके चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळू शकतात. व्यवसाय हळूहळू स्थिर होईल आणि सध्याच्या समस्यांचं निराकरण होण्यास सुरूवात होईल. मुलांसोबत सलोख्याचे संबंध ठेवा. माध्यम, कला आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक राशी
व्यावहारिकदृष्ट्या हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. चिंता किंवा मानसिक दबाव कायम राहू शकतो, तरीही प्रत्यक्ष परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. नवीन घर, जमीन, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वेळ अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असू शकतो. नोकरी, बढती, पगारवाढ आणि करिअरशी संबंधित बाबींमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. शनीच्या प्रभावामुळे मानसिक चिंता आणि तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते. प्रवास करताना सावध राहा.
धनु राशी
हा आठवडा धनु राशीसाठी प्रगती आणि यश घेऊन येईल. तसंच खर्चात थोडी वाढ होऊ शकते. रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय आणि करिअरमध्ये कठोर परिश्रम करण्याची ही वेळ आहे. येत्या काही दिवसांत परिस्थितीत बदल होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची किंवा उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. करिअर, नोकरी आणि व्यवसायासाठी काळ अनुकूल राहील. माध्यम, कला आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरेल. आदर आणि प्रतिष्ठा वाढेल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी यश हळूहळू वाढत आहे. आठवड्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित समस्या सुटण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान-सन्मान प्राप्त होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. संयमाने आणि समजूतदारपणे वागलात आणि कौटुंबिक वाद टाळले तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती आणि यश घेऊन येईल.
कुंभ राशी
कुंभ राशीचे लोक या आठवड्यात स्थलांतर आणि प्रवास करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पाठिंबा आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंद मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती जमा करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांदरम्यान संयम बाळगा. मतभेद होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा. काम, व्यवसाय, करिअर किंवा कोणत्याही महत्त्वाच्या उद्देशाने केलेला प्रवास सकारात्मक परिणाम देण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी फायदेशीर ठरतील. तुम्हाला तुमच्या आईकडून पाठिंबा मिळू शकतो. वाहने आणि मालमत्तेशी संबंधित प्रकल्पांमध्ये संधी निर्माण होऊ शकतात.
मीन राशी
मीन राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि फायदेशीर असेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत मोठी प्रगती दिसू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते आणि एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. कठोर परिश्रम केल्यास आणि सकारात्मक विचार केल्यास या आठवड्यात चांगले परिणाम मिळवू शकता. तसंच तुमच्या आईचे आरोग्य, वाहन आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. ९ तारखेनंतर तुम्हाला मानसिक शांती आणि कामात सुधारणा अनुभवता येऊ शकते.
