Best Career Option For Mulank 7 : अंकशास्त्रात व्यक्तीच्या मूलांकावरून भविष्यात होणाऱ्या किंवा पुढे घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज लावता येतो. तर यासाठी जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक शोधला जातो. मूलांक संख्या ही १ ते ९ पर्यंत असते. मूलांक शोधण्यासाठी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्यांना मूलांक ७ असतो. मूलांक ७ वर केतू ग्रहाचा प्रभाव असतो. अशा मंडळी स्वभावाने खोल विचार करणारे, आध्यात्मिक, जिज्ञासू आणि रहस्यमय असतात. त्यांना एकटे काम करायला आवडते आणि प्रत्येक विषयात खोलवर जाण्याचा प्रयत्न करतात. तर या जन्मतारखांसाठी कोणते करिअर बेस्ट असू शकते चला जाणून घेऊयात…
संशोधन आणि विश्लेषणाशी संबंधित करिअर
७ मूलांकाची मंडळी संशोधन करण्यात आणि नवीन गोष्टी समजून घेण्यात पारंगत असतात. म्हणूनच, संशोधक, शास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, तपास अधिकारी किंवा संशोधन लेखक अशी क्षेत्रे त्यांच्यासाठी योग्य असू शकतात. दीर्घकाळ एखाद्या विषयावर संयमाने काम करू शकतात.
तुम्ही खोलवर विचार करणारे असता त्यामुळे लेखन, ब्लॉगिंग, कंटेंट रायटिंग, कविता, कादंबऱ्या किंवा पटकथा लेखन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. त्यांचे विचार अनोखे आणि आकर्षक असतात, जे वाचकांना आकर्षित करतात. डिजिटल मीडिया सारखी क्षेत्रे देखील त्यांच्यासाठी चांगले पर्याय असू शकतात.
त्यांच्याकडे विश्लेषणात्मक कौशल्ये मजबूत आहेत, म्हणून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, प्रोग्रामिंग किंवा तांत्रिक संशोधन यासारखी क्षेत्रे त्यांच्यासाठी आदर्श आहेत. या व्यक्ती अशाप्रकारच्या समस्या अगदी सहज सोडवू शकतात. अंकशास्त्रात, ७ हा मूलांक पाण्याशी देखील संबंधित आहे. म्हणूनच सागरी अभियांत्रिकी, शिपिंग, ट्रॅव्हल ब्लॉगर्स किंवा पर्यटन उद्योगात यशस्वी होऊ शकतात. त्यांना नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे आवडते. ही मंडळी संवेदनशील आणि समजूतदार असतात. म्हणूनच, मानसशास्त्रज्ञ, सल्लागार किंवा जीवन प्रशिक्षक म्हणून चांगले करिअर करू शकतात. त्यांना इतरांच्या भावनांची खोलवर समज असते.

