प्रत्येकजण स्वप्ने पाहतो. असे म्हणतात की स्वप्ने आपल्याला भविष्यातील घटनांकडे निर्देशित करतात. त्याचबरोबर काही स्वप्ने पाहून आपल्याला आनंद होतो, तर काही स्वप्ने पाहून आपण घाबरून जातो. खरं तर, हे आवश्यक नाही की आपण पाहिलेल्या स्वप्नाचा अर्थ वास्तविक जीवनातही असेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात आपले स्वतःचे लग्न पाहिल्यास याचा अर्थ काय होतो. चला जाणून घेऊया.

लग्नाचे स्वप्न पाहणे

तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्या मनात लग्नाचं स्वप्न येत असेल. तर हे एक शुभ चिन्ह आहे असे मानण्यात येते आणि याचा अर्थ असा आहे की आपण नातेसंबंध, व्यवसायात वचनबद्धता देणार आहात.

9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?
5th April Panchang Papmochani Ekadashi Rashi Bhavishya
५ एप्रिल पंचांग: पापमोचनी एकादशी तुमच्या राशीला लाभणार का? मेष ते मीन राशीपैकी कुणाला लाभेल विठ्ठलाची कृपा?
Swapna Shastra
Swapna Shastra : स्वप्नात ‘या’ पाच गोष्टी दिसणे मानले जाते शुभ! चांगला काळ येण्याचे संकेत, मिळू शकते आनंदाची बातमी
dreams
Swapna Shastra : स्वप्नात ‘या’ जवळच्या व्यक्तींना पाहणे मानले जाते शुभ संकेत

जोडीदारासोबत लग्नाचे स्वप्न पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार लव्ह पार्टनरसोबत लग्नाचे स्वप्न पडले तर ते शुभ संकेत आहे. तसेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या नात्याचे लग्नात रूपांतर करणार आहात. तसेच, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

( हे ही वाचा: १२ वर्षांनंतर गुरु ग्रह झाला वक्री; ‘या’ ३ राशींना धनलाभासह मिळेल भाग्याची साथ)

लग्नाच्या तयारीची स्वप्ने

जर तुम्हाला लग्नाच्या तयारीची स्वप्ने पडत असतील तर ते चांगले लक्षण नाही असे सांगितले आहे. म्हणजे येत्या काही दिवसांत तुम्हाला मानसिक चिंता वाटू शकते. तणावही असू शकतो. किंवा तुम्हाला करिअर आणि व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते.

दुसऱ्याशी लग्नाचे स्वप्न

जर तुम्ही तुमच्या प्रेमी जोडीदाराशिवाय इतर कोणाशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ तुमचे सध्याच्या नात्यात फारसे समाधानी नाही आहात. तसेच, ज्याच्यासोबत तुम्ही स्वप्न पाहिले आहे त्याच्याशी तुमची मानसिकता जुळते आहे. म्हणूनच तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे आहे.

( हे ही वाचा: Shadashtak Yoga: सूर्य आणि राहू ग्रह बनवत आहेत अशुभ षडाष्टक योग; ‘या’ ३ राशींच्या वाढू शकतात अडचणी)

लग्न मंडप आणि नृत्य

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात लग्न मोडणे हे चांगले स्वप्न मानले जात नाही. स्वप्नात लग्न मोडणे म्हणजे तुमच्या कामात व्यत्यय येईल असे दर्शीवण्यात येते. तुमच्या स्वप्नात लग्नाचा मंडप पाहणे म्हणजे तुमच्या घरात काही शुभ कार्य होणार आहे. स्वप्नात लग्नात नाचणे हे एक चांगले स्वप्न आहे. स्वप्नात लग्नात नाचणे म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.