Biggest weakness of mulank 1 : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा मूलांक १ असतो. तुमच्या मूलांकाचा स्वामी ग्रह सूर्य असतो, जो आत्मविश्वास, नेतृत्व, प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असतो. यामुळेच मूलांक १ असणारी मंडळी गर्दीत उठून दिसतात, आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेले असतात. तर आज आपण मूलांक १ च्या चांगल्या आणि कमकुवत बाजू जाणून घेणार आहोत…

१ मूलांकाचे चांगले गुण

तुमच्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे जलद निर्णय घेण्याची क्षमता. तुम्ही संधी ओळखतात, पटकन निर्णय घेतात, जे अनेकदा योग्य ठरतात. शिवाय, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणे, दबावाला बळी न पडणे ही त्यांची खरी ओळख असते.

पण, अंक १ असलेल्या लोकांच्या काही सवयी असतात, ज्या हळूहळू त्यांच्या मार्गात अडथळे बनतात. अनेकदा, या लहान कमतरता त्यांना मोठे यश मिळवण्यापासून रोखतात. चला, तर त्याच सवयींबद्दल जाणून घेऊयात…

अतिआत्मविश्वास महागात पडेल

तुमच्यात अतिआत्मविश्वास असतो. तुंजी योग्य तयारीशिवाय मोठे निर्णय घेता आणि अडचणीत येता.

अहंकारामुळे गोष्टी बिघडतात

आपलंच खरं असं स्वीकारून तुम्ही तुम्ही इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करून जाता. त्यामुळे ही सवय कधीकधी कामावर परिणाम करते. कधीकधी नाती आणि संधी दोन्ही हातातून निसटून जातात.

सल्ला न ऐकण्याची सवय

दुसऱ्यांचा सल्ला ऐका. कारण – योग्य सल्ला त्यांना मोठ्या संकटातून वाचवू शकतो.

रागावर नियंत्रण

राग ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी असू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावल्याने त्यांच्या नात्यांना आणि करिअरला हानी पोहोचू शकते.

तुमच्या हट्टी स्वभावामुळे समस्या वाढतात का?

मूलांक १ असणारी मंडळी हट्टी असतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयापासून मागे हटायला त्यांना आवडत नाही. त्यामुळे, त्यांच्या हट्टीपणामुळे ते सर्वत्र अडचणीत येतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या नात्यांवर दिसून येतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)