Which zodiac sign is the leader of fire : ज्योतिषशास्त्रात चार मुख्य घटकांचा अभ्यास केला जातो. पाणी, पृथ्वी, अग्नि, वायू. या चार तत्त्वांमध्ये १२ राशी विभागल्या जातात. ही तत्त्वे व्यक्तीच्या स्वभावाचे पारंपरिक ज्योतिषीय वर्णन करण्यासाठी वापरली जातात. व्यक्तीचा स्वभाव केवळ राशीवर अवलंबून नसून संपूर्ण जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती, लग्न, चंद्रराशी इत्यादींचाही त्यावर प्रभाव मानला जातो. तर आज आपण अग्नी तत्व राशीबद्दल जाणून घेणार आहोत.

अग्नी तत्त्व राशी म्हणजे ज्योतिषशास्त्रात अग्नी (Fire) या तत्त्वाशी संबंधित राशी. या राशींच्या व्यक्तींमध्ये उत्साह, आत्मविश्वास, नेतृत्व, धाडस यांसारखे गुण अधिक प्रमाणात दिसतात. राशीचक्रातील तीन राशी अग्नी तत्त्वाखाली येतात. पहिली रास मेष, त्यानंतर सिंह आणि शेवटी धनु. या तिन्ही राशींसाठी सूर्य हाच ऊर्जेचा स्रोत मानला जातो. या राशींचे काही गुण त्यांना जीवनात यश व प्रसिद्धी मिळवून देतात असे मानले जाते. चला, या गुणांबद्दल जाणून घेऊया.

ऊर्जा

अग्नी तत्त्वाच्या तिन्ही राशी ऊर्जावान मानल्या जातात. जर त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली. तर ते जीवनात मोठे यश मिळवू शकतात. कोणतेही काम उत्साहाने कसे सुरू करावे हे त्यांना अगदी चोख माहीत असते.

उत्साही

मेष, सिंह आणि धनु या तिन्ही राशींमध्ये नेहमी उत्साह दिसून येतो. तो जीवनाच्या कोणत्याही टप्प्यातून जात असला तरीही त्यांचा उत्साह क्वचितच कमी होतो. जर या अग्नी राशींच्या कुंडलीत सूर्य शुभ असेल. तर त्यांना निश्चितपणे शुभ फळे मिळतील. तुम्हाला कुंडलीतील सूर्याचे स्थान, म्हणजेच सूर्य कोणत्या घरात आहे, हे माहिती असले पाहिजे.

धैर्य

अग्नी राशीत जन्मलेले लोक धाडसी मानले जातात आणि अनेकदा आयुष्यात मोठे धोके पत्करतात. त्यांची निर्भयता कधीकधी त्यांना अडचणीत आणू शकते. पण, त्यावर चांगल्या प्रकारे मात कशी करायची हे देखील त्यांना माहिती असते.

नेतृत्व

तिन्ही अग्नी राशींवर सूर्याचा प्रभाव आणि सूर्य हा ग्रहांचा स्वामी असल्यामुळे अग्नी राशीचे लोक चांगले लीडर देखील ठरतात. त्यांची नेतृत्व क्षमता त्यांना उच्च पदांवर पोहोचण्यास मदत करू शकते.

स्पष्टता

अग्नी तत्त्वाच्या मेष, सिंह आणि धनु या राशींच्या व्यक्तींना आपले विचार स्पष्टपणे आणि थेट मांडायला आवडतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींना खुशामत, लाळघोटेपणा किंवा खोटेपणाचा आधार घेऊन वागणे पसंत नसते. अशा स्वभावाच्या लोकांपासून त्या अनेकदा अंतर ठेवतात. त्यांच्याशी चांगले आणि विश्वासाचे संबंध निर्माण करायचे असतील, तर प्रामाणिकपणे, स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने संवाद साधणे अधिक योग्य ठरते. जर तुमची राशी मेष, सिंह किंवा धनु असेल किंवा तुमचा जन्म या तीन लग्न राशींमध्ये झाला असेल. तर तुमच्यामध्येही वरील वैशिष्ट्ये दिसून येऊ शकतात…

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)