Your Anger Personality As Per Date Of Birth : तुम्हाला माहित आहे का की, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून तुम्ही केवळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच नाही, तर त्याच्या भविष्याबद्दलही बरेच काही शिकू शकता? इतकेच नाही, तर त्यांची जन्म तारीख पाहून एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टींवरून जास्त रागावते हे देखील जाणून घेऊ शकता. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांक आपला राग व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही मूलांक क्षुल्लक गोष्टींवरून रागावतात, तर काही जण स्वतःला सावरतात. चला तर मग, प्रत्येक मूलांक रागावल्यावर कशी प्रतिक्रिया देतो त्याबद्दल जाणून घेऊयात…
मूलांक १
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. तुमच्यावर सूर्याचे अधिपत्य आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा कोणी तुमचा आत्मसन्मान दुखावण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्यांना सर्वाधिक राग येतो. रागावल्यावर, त्यांची बोलण्याची पद्धत इतकी कठोर आणि धारदार होते की, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना भीती वाटू शकते. जरी ते सुरुवातीला आपला राग दाबण्याचा प्रयत्न करत असले, तरी जर समोरची व्यक्ती त्यांना सतत त्रास देत राहिली. तर ते शांत होऊ शकत नाहीत.
मूलांक २
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. तुम्ही खूप भावनिक असतात आणि ज्यांच्याशी तुमचे नाते घट्ट असते. त्यांची साथ कधीच सोडत नाही. पण, जर कोणी त्यांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना खूप राग येतो. तुम्ही क्वचितच रागावता आणि बहुतेकदा शांत राहण्याचा प्रयत्न करतात.
मूलांक ३
३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. तुमच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे किंवा विनाकारण वाद घालणे. अशा गोष्टी तुमच्याबरोबर केल्या की, तुम्हाला लगेच राग येतो.
मूलांक ४
४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. तुम्ही खूप हट्टी असता. तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुम्हाला प्रचंड राग येतो. तुम्ही खूप शांत असता. पण, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही सहजासहजी शांत होत नाही.
मूलांक ५
तुमचा वाढदिवस ५, १४ आणि २३ तारखेला येत असेल तर तुमचा मूलांक ५ असतो. तुम्ही लहानसहान गोष्टींवरून खूप चिडतात, रागात असताना तुमची भाषा अधिकाधिक कठोर होत जाते, ज्यामुळे नातेसंबंधही बिघडू शकतात. पण, ते जितक्या लवकर तुम्हाला राग येतो. तितक्या लवकर तुम्ही शांत देखील होता. जेव्हा कोणी तुमचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमचे ऐकून घेत नाही, तेव्हा त्यांचा राग अनेकदा तीव्र होताना दिसतो.
मूलांक ६
६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. जेव्हा कोणी तुमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांचा विश्वासघात करतो. तेव्हा तुम्ही जास्त रागावता. अशा परिस्थितीत तुम्हाला नियंत्रणात ठेवणे कठीण जाते.
मूलांक ७
महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. तुमच्या रागाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या गोपनीयतेत होणारा हस्तक्षेप. तुम्हाला आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायला आवडते आणि कोणीही त्यात हस्तक्षेप केलेला तुम्हाला आवडत नाही.
मूलांक ८
८, १७ आणि २६ तारखेला तुमचा वाढदिवस येत असेल तर तुम्ही खूप शिस्तप्रिय असता. कामाच्या ठिकाणी झालेला अगदी थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला आवडत नाही. तुमच्यावर होणारा अन्याय तुम्ही सहन करू शकत नाहीत. तुमचा मूलांक शनीप्रिय असूनही तुम्ही भरपूर सहनशील असतात आणि पटकन प्रतिक्रिया देत नाहीत.
मूलांक ९
९, १८ आणि २७ जन्मतारीख ज्यांची असते त्यांचा मूलांक ९ असतो. रागाच्या भरात तुम्ही पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाता आणि मोठ्याने ओरडायला लागता, कोणाचेही ऐकत नाहीत. जेव्हा कोणी त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांचा राग उफाळून येतो.
जन्मतारखेनुसार रागात तुम्ही देखील अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा
