face says about your Personality : मानवी चेहऱ्यांचे आकार वेगवेगळा असतो. काही लोकांचे चेहरे गोल असतात, काहींचे चौकोनी, तर काहींचे अंडाकृती असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, रास, जन्म तारीख यांच्यानुसार चेहऱ्याची हीच रचना एखाद्या व्यक्तीचे मन, स्वभाव, भविष्याबद्दल अनेक गोष्टी सहज सांगू शकते. चला, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक चेहऱ्याचा आकार त्याच्याबद्दल नेमकं काय सांगतो चला जाणून घेऊयात.

गोल (Round Face)

जर तुमचा चेहरा गोल आणि गाल अगदी गुबगुबीत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही स्वभावाने भावनिक, प्रेमळ, दयाळू आणि मनमिळाऊ असतात. नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. तुमचे मन खूप शुद्ध असते. कला, शिक्षण, मीडिया, हॉस्पिटॅलिटी आणि जनसंपर्क यांसारख्या क्षेत्रांमध्ये तुम्ही यशस्वी ठरू शकता. तुम्ही संपत्तीच्या बाबतीत सुद्धा खूप भाग्यवान ठरता.

चौकोनी (Square Face)

जर तुमचे कपाळ, जबडा आणि गालांची रुंदी जवळपास समान असेल, तर तुमचा चेहरा चौकोनी आकाराचा असतो. तुम्ही दृढनिश्चयी, अत्यंत व्यावहारिक, जिद्दी आणि शिस्तप्रिय असतात. तुमचे निर्णय अनेकदा योग्य ठरतात कारण हृदयापेक्षा डोक्याचा वापर करतात. तुमच्यात उल्लेखनीय नेतृत्व क्षमता असते. अनेकदा सैन्य, राजकारण, प्रशासकीय सेवा, व्यवसाय, अभियांत्रिकी किंवा आयात-निर्यात क्षेत्रात तुम्ही काम करता. तुम्ही त्यांच्या कामात यशस्वी होता, आयुष्यात सर्व काही त्यांच्या कठोर परिश्रमाने अगदी सहज मिळवता.

अंडाकृती (Oval Face)

अंडाकृती चेहऱ्याचे लोक बौद्धिक, कलात्मक आणि संतुलित स्वभावाचे असतात. प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून घेतात आणि कोणत्याही वातावरणाशी सहज जुळवून घेतात. त्यामुळे डिझायनिंग, फॅशन, अभिनय, संशोधन, लेखन आणि व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत ते उत्तम यश मिळवू शकतात. अशा लोकांच्या नशिबात कीर्ती व प्रसिद्धी लिहिलेली असते, असे मानले जाते. त्यांनी आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून त्यावर सातत्याने लक्ष केंद्रित ठेवले, तर यशही त्यांच्या मागे येते असे म्हटले जाते.

रुंद (Broad Face)

तुमचा चेहरा किंचित मोठ्या आणि रुंद असेल तर तुमची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही लोभाला बळी पडत नाहीत. तुम्ही फसवणूक व कपटापासून दूर राहता. नेहमी आनंदी व गोड बोलणारे असतात. असे लोक चांगले शिक्षक, मार्गदर्शक आणि लेखक सुद्धा बनू शकता.

हृदयाकृती (हार्ट शेप चेहरा)

जर तुमचा चेहरा हृदयाकृती असेल तर आकर्षक, भावूक, समजूतदार आणि सर्जनशील स्वभावाचे असतात. असे लोक नाती मनापासून आणि पूर्ण प्रामाणिकपणे जपतात. कला, संगीत किंवा इतर सर्जनशील क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष रुची असते. हे लोक कोणतीही गोष्ट केवळ विचाराने नव्हे, तर मनापासून अनुभवून आणि भावनेच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)