scorecardresearch

२४ नोव्हेंबरला पहिला मार्गशीर्ष गुरुवार; २०२२ मधील महालक्ष्मी व्रताच्या तिथी, महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या

Margashirsha Guruwar Date, Puja Vidhi, Shubh Muhurta: हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची मान्यता आहे..

२४ नोव्हेंबरला पहिला मार्गशीर्ष गुरुवार; २०२२ मधील महालक्ष्मी व्रताच्या तिथी, महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या
मार्गशीर्ष गुरूवार व्रत महत्त्व (फोटो:संग्रहित/संपादित)

Margashirsha Guruwar Date, Puja Vidhi, Shubh Muhurta: दिवाळीनंतर थंडावलेला उत्साह मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने पुन्हा जीवित होतो. हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची मान्यता आहे.. महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला तसेच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना यंदा २४ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या असून याच्या दुसऱ्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचा योग जुळून आला आहे. यंदा कोणत्या तारखेला मार्गशीर्ष गुरुवार असतील तसेच, या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व

आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. द्वापार युगात सौराष्ट्रचा राजा भद्रश्रवा, भद्रश्रवाची राणी सुरतचंद्रिका, भद्रश्रवाची कन्या शामबाला व महालक्ष्मी यांच्या कथेचे पठण या व्रताच्या निमित्त करण्याची पद्धत आहे. आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मी सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा असते.

मार्गशीर्ष गुरुवार २०२२ तारीख

यंदा मार्गशीर्ष मासाचा पहिलाच दिवस म्हणजेच २४ नोव्हेंबर हा मार्गशीर्ष गुरुवार आहे. तर २३ डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या आहे. यादरम्यान चार मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत. यंदा २४ नोव्हेंबर, १ डिसेंबर, ८ डिसेंबर, १५ डिसेंबर व २२ डिसेंबर या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आहेत.

वृश्चिक राशीत ३ मुख्य ग्रहांचा त्रिकोण; ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत ३० दिवसात मोठ्या बदलाचे संकेत

मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी

मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या