Business minded zodiac signs : आपल्या देशामधील अनेक तरुण मंडळी सध्या स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. लॉकडाउनपासून स्वत:ची कंपनी, स्वतःचे दुकान सुरु करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगात वेगवेगळ्या क्षेत्रात, मोठमोठ्या व्यवसायांमध्ये अनेकांनी आतापर्यंत स्वतःची नाव मोठे केले आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार, १२ पैकी काही राशींना दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. यामुळेच ते एका नोकरीत जास्त काळ टिकत नाहीत.

मेष, सिंह, वृश्चिक, मकर अनेकदा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. असे म्हटले जाते की व्यवसाय या व्यक्तींना चांगलाच जमतो. कारण – त्यांच्यामध्ये जोखीम पत्करण्याची क्षमता असते. या मंडळींमध्ये व्यवसायात प्रचंड यश मिळण्याची सर्वाधिक शक्यता असते.

मेष

तुम्ही उत्साही आणि मेहनती असतात. काहीही सुरू करायला तुम्ही कधीच घाबरत नाहीत. जोखीम पत्करण्यातही पारंगत असतात. यामुळेच मेष राशीचे लोक व्यवसायात नवीन उंची गाठतात. स्वतःला वेगळे सिद्ध करण्यावर विश्वास ठेवतात.

सिंह

तुमचा स्वामी ग्रह सूर्य आहे. तुमचा राजेशाही स्वभाव असतो. दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली तुम्ही काम करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा स्वतःच्या मनाप्रमाणे काम करणे पसंत करता. तुमच्यात चांगले नेतृत्वगुण असतात. म्हणून तुम्ही चांगले व्यावसायिक बनवता.

वृश्चिक

तुम्ही चांगले प्लॅन बनवता आणि तुमची दूरदृष्टी सुद्धा चांगली असते. तुमचे मन व्यवसायावर अत्यंत केंद्रित असते. एकाग्रता इतकी प्रबळ असते की ते तोट्यात चाललेल्या व्यवसायालाही फायद्यात बदलू शकतात. दबावाखाली काम करू शकत नाहीत, त्यामुळे अनेकदा स्वतंत्रपणे काम करण्यास पसंती दाखवता.

मकर

तुम्ही खूप मेहनती असतात. जे काही करायचे ठरवतात ते पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चयी असता. त्यांच्याकडे तीक्ष्ण बुद्धी असते आणि ते व्यवसायात यश मिळवतात.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)