Mahadev Favorite Zodiac Signs : जो कोणी भक्त महादेवाला शरण जातो, आपले सर्वस्व त्यांना अर्पण करतो. त्या भक्ताला नेहमीच महादेवाचा आशीर्वाद मिळतो. शिव हे असे दैवत आहेत जे आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात आणि एकदा प्रसन्न झाल्यावर ते कधीही त्यांना एकटे सोडत नाहीत अशी मान्यता आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार १२ पैकी तीन राशी भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. असं मानलं जातं की, या तीन राशींचे ईष्ट देव भगवान शिव आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, त्या कोणत्या तीन राशी आहेत, ज्यांच्या आयुष्यात महादेवाच्या कृपेने अडचणी कमी येतात आणि संकट आली तरीही बाहेर पडायला मदत मिळते.

कर्क

तुमच्या राशीचा स्वामी चंद्र देव आहे. चंद्र, हा थेट भगवान शिवाशी संबंधित आहे. चंद्र भगवान शिवाच्या मस्तकावर वसलेला आहे. त्यामुळे तुमची रास शिवाला प्रिय असते. त्यांच्यावर प्रसन्न होऊन, भगवान त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. भगवान शिवाच्या आशीर्वादाने, तुम्ही कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करतात. त्यामुळे भगवान शिव तुमच्या राशीचे अधिपती मानले जातात.

मकर

ही राशी शिवाच्या सर्वात प्रिय राशींपैकी एक मानली जाते. तुमच्यावर भगवान शिवाची विशेष कृपा लाभलेली असते. तुमच्या राशीचे अधिपती दैवत देखील भगवान शिवच असतात. मकर राशीचा अधिपती ग्रह शनिदेव आहे आणि भगवान शिव हे शनिदेवाचे दैवत आहेत. तुम्हाला शनिदेव आणि शिव या दोघांचाही आशीर्वाद मिळतो.

कुंभ

शनिदेवाची रास असलेल्या तुमच्या कुंभ राशीला भगवान शिवाचा प्रचंड आशीर्वाद लाभतो. भगवान शिव हे कुंभ राशीचे संरक्षक दैवत देखील असतात. त्यामुळे, कुंभ राशीच्या व्यक्तींनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा नियमितपणे भगवान शिवाची पूजा करावी. शिवाच्या आशीर्वादाने, व्यक्तींना त्यांच्या कष्टाचे पूर्ण आणि जलद फळ मिळते. शिवाच्या कृपेने, व्यक्ती आपल्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करतात.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)