Perfect Couple Zodiac Matches Horoscope: प्रेम हा तसा सगळ्या पलीकडे जाऊन अनुभवण्याचा विषय आहे, मात्र प्रेमात जितकं मॅजिक हवं तितकंच लॉजिक असणंही आवश्यक आहे. प्रेम करणे व संसार करणे या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कदाचित प्रेमात रास, ज्योतिष बघणे गरजेचे नसले तरी संसाराआधी निदान आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जुळवून घेऊ शकतो हे पाहणे आवश्यक असतेच. यालाच इंग्लिश मध्ये Compatibility असं म्हणतात. तुमचा जोडीदार तुमच्या राशीला व त्यानुसार ठरणाऱ्या तुमच्या स्वभावाला साजेसा आहे का याबद्दल तुम्हालाही कुतुहूल असेलच ना? चला तर मग आज आपण ज्योतिषशास्त्राच्या अनुसार कोणत्या राशी परफेक्ट जोडीदार ठरू शकतात हे जाणून घेऊयात…

मेष

मेष राशीच्या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात त्यामुळे त्यांना स्पष्टवक्त्या व संयमी मिथुन राशीच्या व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरू शकतात. कुंभ, सिंह व धनु या राशी सुद्धा मेषसाठी साजेश्या असतात मात्र या मंडळींना किंचित समजूतदारपणा दाखवावा लागेल.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत

वृषभ

वृषभ राशीची मंडळी अत्यंत स्पष्टवक्ती व लॉजिकल असतात त्यांना स्वप्नात जगणे आवडत नाही. कामाच्या बाबतही या व्यक्ती गंभीर असतात.वृषभसाठी मीन व कर्क या राशी साजेश्या आहेत, या व्यक्ती बोलक्या असतात त्यामुळे संसारात समतोल राखणे शक्य होते.

मिथुन

मिथुन ही अत्यंत रोमँटिक रास म्हणून ओळखली जाते त्यामुळे यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात त्यांना तुळ व कुंभ राशीच्या व्यक्ती साजेश्या जोडीदार ठरतील. या दोन्ही राशी लवचिक असतात समोरच्याच्या स्वभावानुसार त्या वागणूक बदलतात त्यामुळे यांची जोडी उत्तम ठरू शकते.

कर्क

कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. चंद्राप्रमाणेच नाजूक व संवेदनशील असा यांचा स्वभाव असतो. अशा व्यक्तींना समजून घेणारे जोडीदार हवे असतात. वृश्चिक व मीन रास त्यांना साजेशी आहे. जोडीदारांमध्ये चांगली मैत्री असते पण सुरुवातीच्या काळात समजून घेण्यात थोडी गल्लत होऊ शकते.

सिंह

सिंह रास नावाप्रमाणेच धडाकेबाज असते, यांचा स्वभाव नेतृत्व करणारा असतो त्यांना समान स्वभावाच्या व्यक्ती जोडीदार म्हणून लाभल्यास भांडणे होऊ शकतात. अग्नि तत्त्वाच्या सिंह राशीच्या व्यक्तीच्या तापट स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव वायुतत्त्वाच्या कुंभ राशीच्या व्यक्तीचा असतो. त्यामुळे सिंह व कुंभ यांची जोडी चांगली जमते .

कन्या

कन्या राशीची लोकं बुद्धिमान असतात व त्यांना विश्लेषक व तर्कसंगत विचारांच्या व्यक्तींबद्दल आकर्षण असते. कन्या रास जलतत्वाच्या कोणत्याही राशींसोबत सुखाचा संसार करू शकते.

तूळ

तूळ रास ही वागणुकीने शांत, आनंदी व संयमी असते मात्र यांच्या नेतृत्व करण्याचा सुप्त गुण असतो, तूळ राशीचे चिन्ह म्हणजेच संतुलन साधणारी न्याय करणारी तुला. यामुळे यांना निर्णय घेण्याची मुभा देणारी मंडळी आवडतात. तूळ राशी मुख्यतः धनु व मिथुन यांच्यासह आनंदी राहू शकतात.

वृश्चिक

वृश्चिक अत्यंत हट्टी स्वभाव असणारी ही मंडळी आहेत मात्र यांच्या या स्वभावाचा निर्णय न घेऊ शकणाऱ्या जोडीदाराला फायदा होऊ शकतो. मिथुन रास वृश्चिकसाठी थोडी सोयीची पडते कारण या व्यक्तींचा स्वभाव लवचिक असतो. मात्र या जोडीत अनेकदा खटके उडू शकतात.

धनु

धनु राशीच्या व्यक्ती हसऱ्या व विनोदी स्वभावाच्या असतात. त्यांच्यात मोकळेपणा असतो पण ठाम निर्णय घेताना यांना संभ्रम अधिक असतो. धनुसह नेतृत्व करणाऱ्या राशी म्हणजेच सिंह, तूळ यांचे चांगले जमू शकते.

मकर

मकर रास नेहमी भविष्याविषयी चिंतीत असते, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या सतत अति कष्ट घेतात मात्र त्यांना जोडीदारावर अविश्वास ठेवण्याची सवय असते. अशावेळी रोमँटिक अशा मिथुन राशीची सोबत त्यांना नात्यात सुरक्षित वाटेल याची काळजी घेते. कर्क व मकर ही जोडीही समान स्वभाव असल्याने उत्तम व यशस्वी संसार करू शकते.

कुंभ

कुंभ रास ही सर्वात लवचिक व मदत करण्यासाठी तत्पर अशी रास आहे. जवळपास अर्ध्याहून अधिक राशींसह कुंभची जोडी उत्तम जमू शकते कारण याचे श्रेय कुंभच्या लवचिकतेला जाते. पण या व्यक्ती जितक्या प्रेमळ तितक्या जिद्दी असतात, मनाविरुद्ध झाल्यास त्यांची मनधरणी करणे खूप कठीण असते..

मीन

मीन ही जलतत्त्वाची राशी आहे. कलेची ओढ व प्रेमळ स्वभाव असणारी ही मंडळी जितकी भावविश्वात जगणारी असतात तेवढेच सतर्क असतात. मीन व कन्या या राशी उत्तम संसार करू शकतात मात्र मीनला शिस्त लावणारी रास हवी असते अन्यथा संसारात स्थैर्य राहात नाही.

(वरील लेख हा माहितीपर असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)