Which People Struggle with Overthinking and Confusion : अंकशास्त्रानुसार असे दोन मूलांक असतात, जे मानसिक गोंधळ आणि अज्ञात भीतीला बळी पडू शकतात. योग्य मार्गदर्शनाशिवाय या व्यक्ती चुकीच्या दिशेने पाऊल टाकतात. यापैकी पहिला मूलांक ७ आहे. ज्यांचा वाढदिवस कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला असतो. त्यांचा मूलांक ७ असतो. या व्यक्ती बुद्धिमान असल्या तरीही छोट्या छोट्या भीतीने त्रस्त असतात. याव्यतिरिक्त, २ मूलांक म्हणजेच २, ११, २०, २९ असलेल्या मंडळींच्या बाबतीत सुद्धा अशाच काही गोष्टी घडू शकतात. तर आज आपण ७ आणि २ मूलांकाबद्दल जाणून घेऊयात…

मूलांक ७ (७, १६, २५)

या मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे, ज्याला अध्यात्माचा घटक मानले जाते. पण, हा ग्रह व्यक्तीला संभ्रम आणि अज्ञात भीती देखील देऊ शकतो. या मूलांकाचे लोक बुद्धिमान असतात. पण, त्यांना योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. मार्गदर्शनानुसार चालल्यास तुम्ही राजासारखे जीवन जगता. पण, चुकीच्या दिशेने भरकटलात जीवन उद्ध्वस्त देखील होऊ शकते. कधीकधी, अतिविचारामुळे तुम्ही गोंधळात पडू शकतात. पण, जर त्यांनी अध्यात्माच्या मार्गाचे अनुसरण करण्यास सुरुवात केली, तर त्यांना जीवनात अत्यंत शुभ परिणाम मिळतात. त्याचबरोबर वाईट भावना मनातून काढून टाकल्या तर त्यांचे जीवन सुरळीत चालते.

मूलांक २ (२, १०, २०, २९)

मूलांक २ असणारी मंडळी स्वभावाने भावनिक, संवेदनशील असतात. एखादी गोष्ट पटकन मनाला लावून घेतात. त्यातच जर अशा व्यक्तीची रास जल तत्वातील म्हणजे कर्क, वृश्चिक किंवा मीन असेल, तर त्यांचा स्वभाव जास्त भावनिक असतो. तुम्ही अतिविचार करता, भविष्याची चिंता करून मानसिक ताण निर्माण करता. त्यामुळे तुमचे वर्तमानही खराब करू शकते. तुम्ही सर्जनशील असता. पण, तुम्ही कल्पनेच्या दुनियेत वावरतात, ज्यामुळे मानसिक समस्यांनी नकळत घेरले जाता. पण, जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ते कला क्षेत्रासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात. या मंडळींना योग आणि ध्यान केल्याने खूप चांगले परिणाम मिळू शकतात.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही…)