Birth Number 4 Personality : अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाची स्वतःची एक वेगळी ओळख असते. कुंडली शास्त्राच्या माध्यमातून व्यक्ती आणि तिचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे अंकशात्रात सोप्या गणिताचा आधार घेऊन व्यक्तीचे विविध पैलू आणि मानसिकता जाणून घेता येते. या संख्याशास्त्रात १ ते ९ अंकाची किमया आहे आणि या किमयेमध्ये पडद्याआड नऊ ग्रह उपस्थित असतात.

१ ते ९ मूलांकापैकी चार या मूलांकामधे सुपर पॉवर असतात, ज्या त्यांना जग जिंकण्यास मदत करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांची जन्मतारीख ४,१३,२२ व ३१ आहे अशा लोकांचा मूलांक ४ असतो. या अंकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव आढळतो. त्यामुळे तुम्ही चौकटीबाहेरचा विचार करणारे, रहस्यमय, अत्यंत व्यावहारिक असतात. तुमचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे तुम्ही जे ठरवतात ते साध्य करता, समस्यांवर उपाय शोधण्यात पारंगत असता आणि सहजासहजी हार मानत नाहीत. त्यामुळे मेहनती ठरता.

मूलांक ४ मध्ये कोणत्या ४ सुपर पॉवर असतात?

चौकटीबाहेर विचार

तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची अद्वितीय विचारसरणी. जिथे सामान्य लोक विचार करणे थांबवतात, तिथे तुमचे मन कामाला लागते. ही ऊर्जा म्हणा किंवा विचर तुम्हाला अशा गोष्टी साध्य करण्यास सक्षम करते ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. याच अद्वितीय विचारसरणीमुळे तुम्ही जीवनात मोठे यश मिळवतात आणि संशोधक, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक बनतात.

अढळ इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी

राहूच्या प्रभावामुळे तुमच्यात दूरदृष्टी निर्माण होते. भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतात. एकदा तुम्ही एखादी गोष्ट करण्याचे ठरवले की, ती पूर्ण केल्याशिवाय कधीही मागे हटत नाहीत. कधीही हार न मानण्याची तुमची सवय शून्यातून तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबद्दलही तुम्हाला अचूक कल्पना असते.

अत्यंत मेहनती

तुम्ही अत्यंत मेहनती असता. शिक्षण असो वा काम, हा गुण त्यांना सर्वत्र यशस्वी होण्यास मदत करतो. कठोर परिश्रमापासून तुम्ही कधीही दूर पळत नाहीत. अत्यंत नियोजित व शिस्तबद्ध असतात, तुमच्या कामात चुकांना फारसा वाव नसतो.

मैत्रीपूर्ण स्वभाव

तुम्ही खूप मनमिळाऊ असतात. हा गुण तुम्हाला व्यावसायिक यशात हातभार लावण्यास मदत करतो. समाजात कसे वागावे याचे चांगले ज्ञान तुम्हाला असते. तुमचा मनमिळाऊ स्वभाव तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळवून देतो आणि समाजात आदरही मिळवून देतो.