scorecardresearch

Premium

रुचक राजयोग बनताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? मंगळाच्या कृपेने अचानक धनलाभ होण्याची शक्यता

मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करताच रुचक राजयोग तयार होणार आहे.

Ruchak rajyog in kundli
मंगळ ग्रह राशी परिवर्तन २०२३. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ruchak Yog In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करतात आणि शुभ योग तयार करतात, ज्याचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम होतो. १६ नोव्हेंबरला मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे रुचक राजयोग तयार होत आहे. हा योग बनल्यामुळे ३ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच या लोकांचे नशीब चमकू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus Zodiac)

Mangal Ketu Yuti
२ ऑक्टोबरपासून ‘या’ पाच राशींना मिळेल अपार धन? केतू-मंगळदेवाच्या युतीमुळे होऊ शकता लखपती
Uterine fibroids are causing infertility
गर्भाशयाच्या फायब्रॉईड्समुळे करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना!
accurate diagnosis of gallbladder cancer
आरोग्य वार्ता : कृत्रिम बृद्धिमत्तेच्या मदतीने पित्ताशयाच्या कर्करोगाचे अचूक निदान
Daily Horoscoper 15 September 2023
Daily Horoscope: मेषसाठी दिवस अनुकूल तर ‘या’ राशीच्या व्यक्तींचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, पाहा भविष्य

रुचक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून सातव्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळाज तुमचे जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहू शकतात. भागीदारीच्या कामातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. मंगळ तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही नवीन व्यवसायाचा प्लॅन बनवण्यात यशस्वी होऊ शकता तसेच या काळात अविवाहित लोकांचे लग्नही ठरु शकते.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी रुचक राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या कुंडलीतून पाचव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. मुलांची प्रगती होऊ शकते. तसेच तुम्हाला अचानक पैसे देखील मिळू शकतात. नोकरदारांसाठी ऑफिसमध्ये कामाचे चांगले वातावरण असेल तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवी नोकरी मिळू शकते. मंगळ तुमच्या राशीच्या कर्म स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते.

हेही वाचा- आज ऋषिपंचमीला सूर्य-मंगळ युती झाली शक्तिशाली! ‘या’ राशींच्या लोकांना बाप्पा व लक्ष्मी देणार धनरूपी प्रसाद

तुला रास (Tula Zodiac)

तुमच्यासाठी रुचक राजयोगाची निर्मिती पैशाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून धन स्थानी जाणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच तुमचे अडकले पैसे तुम्हाला मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ असून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तसेच, जर तुम्ही मीडिया, फिल्म लाइन, स्पोर्ट्स, मार्केटिंग, पोलिस संबंधित असाल तर तुम्हाला यावेळी विशेष यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will the fate of these zodiac signs change as soon as raja yoga becomes interesting chance of sudden wealth gain due to the grace of mars jap

First published on: 20-09-2023 at 16:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×