Navpancham Rajyog:वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशी परिवर्तन करुन वेळोवेळी शुभ योग निर्माण करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता शुक्र आणि शनीचा नवपंचम राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात शनि आणि शुक्र यांच्यात मैत्रीचा भाव असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात संपत्तीचे वरदान लाभण्याची शक्यता आहेत. त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष राशी –
मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण शुक्र तुमच्या गोचर कुंडलीच्या तिसऱ्या स्थानी आहे आणि तो शनिच्या ११ व्या स्थानी आहे. त्यामुळे नवपंचम राजयोगामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला भावा-बहिणींचे सहकार्य मिळू शकते. तसेच तुमचा व्यावसायिक लाभ देखील होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. एखादा मोठा व्यापाराचा करार होऊ शकतो, तसेच तुमच्या धाडसात आणि शौर्यामध्ये वाढ होऊ शकते.
वृषभ राशी –
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या स्थानी आहे तर शनिदेव दहाव्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे धन आणि कार्यक्षेत्रावर हा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच तुम्हाला अनेक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. व्यावसायिकांना या काळात चांगला फायदा होऊ शकतो. तर नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.
मिथुन राशी –
नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या लग्न आणि भाग्या स्थानी तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारु शकते. तसेच या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. या राशींच्या लोकांना परदेश प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे. तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो.
सिंह राशी –
सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग उत्तम सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून ७ व्या आणि ११ व्या स्थानी हा राजयोग तयार होत आहे. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या जीवनसाथीची प्रगती होऊ शकते. जे आयात-निर्यातीचे काम करतात त्यांच्यासाठी हा राजयोग चांगला ठरु शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.