– जयंती अलुरकर

वेगवेगळ्या नात्यांची
करून सुंदर गुंफण
वेळ पडता हातामध्ये
उभी घेऊन वेसण
तारेवरची कसरत तिची
तीच करू जाणे
नाव तिचे आहे गृहिणी
आता कौतुकाने घेणे!


Housewife Future Predictions By Tarot Card Expert: नात्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या समस्त गृहिणींना टॅरो कार्डनुसार, हे वर्ष कसे जाणार आहे हे पाहुयात.

Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
pune, Pwd Minister, ravindra chavan, Report Potholes, Online App, Discontinued, Urges Citizens,
पीडब्ल्यूडी मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेतच
Viral Video Nagaraj A 12 year old boy who aspires to become an lAS officer User Shared Heartwarming Story
पुस्तके वाचण्याचा छंद अन् आयएएस होण्याचे स्वप्न; पाहा १२ वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयस्पर्शी VIDEO

मेष (Aries Zodiac)

घरात घडणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे. यावर्षी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडायच्या आहेत. घरातल्या निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल. नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करा. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्याची मात्र काळजी घ्या.

वृषभ (Taurus Zodiac)

घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्याशी संवाद वाढवा. घरातील वातावरणात थोडा ताण जाणवेल. जमाखर्चाचा ताळमेळ बसणार नाही. अनावश्यक खर्च टाळा. घरातील मुलांसाठी काहीतरी खास कराल. त्यामुळे मुलं आनंदी राहतील. घरात शुभकार्य होईल. पायांचे दुखणे वाढणार आहे, काळजी घ्या.

मिथुन (Gemini Zodiac)

येणाऱ्या वर्षांमध्ये नव्या ओळखी होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. नव्या ओळखी वाढवताना मात्र सतर्कता बाळगा. जसे दिसते आहे, तसेच आहे ना, याची खात्री करा. सतत येणाऱ्या पाहुण्यांमुळे गृहिणींची दमछाक होईल. घरातूनच एखादा नवा व्यवसाय सुरु करू शकाल. मुला-मुलींची चांगली प्रगती होईल.

कर्क (Cancer Zodiac)

आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या परिश्रमाचे क्रेडिट मिळणार आहे, त्यामुळे आनंदी राहाल. काही गोष्टींकडे कानाडोळा करणे गरजेचे आहे. नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. घरात आणि बाहेर, दोन्हीकडे स्वतःची ओळख तयार कराल. प्रत्येक गोष्टींमध्ये भावना न आणता व्यवहारी राहा. आर्थिक ताण संपेल.

सिंह (Leo Zodiac)

हितशत्रू डोकं वर काढणार आहेत. घरात छोट्या-मोठ्या गोष्टींमधून कुरघोडी होताना दिसतील. घरातल्या बायकांनी समन्वयाने आणि सामंजस्याने राहणे गरजेचे आहे. गृहिणींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. नाहीतर त्रास होईल. मुलांची काळजी घ्या.. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या.

कन्या (Virgo Zodiac)

तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळतील, पण कोणताही हव्यास टाळा. आपल्या अपेक्षा पूर्ण करताना शारीरिक, मानसिक, आर्थिक परिस्थितीचा नीट विचार करा. परिश्रम करणे चुकणार नाही. पैशाची आवक अपेक्षेपेक्षा थोडी कमी झाली तरी चिडचिड करू नका. मुलं व वडीलधाऱ्या व्यक्तिंना वेळ द्या. आरोग्य उत्तम राहील.

तूळ (Libra Zodiac)

हे वर्ष गृहिणींना वडिलधाऱ्यांची काळजी व सेवा करण्यात जाणार आहे. घरातील आरोग्याच्या तक्रारी वाढतील. नवऱ्याची बदली होण्याचे संकेत दिसत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा संभवतो. पैश्यांची आवक ठीकठाक राहील. मुलांची काळजी नको.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

नवीन नाती जोडली जातील. गृहिणींना मुलांच्या लग्नाचे वेध लागतील. त्यासाठी त्यांनी जास्तीत-जास्त प्रयत्न करावेत. काही गृहिणींना मुलांच्या परदेशवारीची तैयारी करायची आहे. मुलांना मिळालेल्या संधीमुळे होणार आनंद आणि त्यांच्या परदेशी जाण्याचे दुःख अशा संमिश्र भावना अनुभवायला मिळतील.

धनु (Sagittarius Zodiac)

तुमच्या आयुष्यात खूपच सुंदर दिवस येणार आहेत. असंभव वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होणार आहेत. एका मागोमाग एक अशा अनेक चांगल्या गोष्टींचा समाचार मिळेल. पैसा, आरोग्य, मन:स्वास्थ्य सर्व काही खूप चांगले आहे. घरात लग्न ठरेल. नवे घर, नवी गाडी घेण्याचे योग्य आहेत.

मकर (Capricorn Zodiac)

घरात वयस्कर व्यक्तिंचा दबदबा अधिक राहील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जाणार आहेत. जमीन-जुमला खरेदी मध्ये मोठ्या माणसांचे मार्गदर्शन मिळेल. गृहिणींचा वेळ त्यांच्या आवडत्या कामामध्ये आणि माणसांमध्ये जाणार आहे. घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी असेल.

हे ही वाचा<< Tarot Card Reading: २०२३ मध्ये तुमच्या राशीला धनलाभ कधी? टॅरो कार्डस् तज्ज्ञ जयंती अलूरकर यांच्याकडून जाणून घ्या

कुंभ (Aquarius Zodiac)

आलेल्या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहेत. या संकटातून तुम्ही व्यवस्थित बाहेर पडू शकाल. पण परिस्थितीने मी किती गांजले आहे हे दाखवण्यातच वेळ वाया जातोय. भोचकपणा टाळा, त्यामुळे स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. परिणामी घरातील पैसा आणि शांतता दोन्हीही जात आहेत. शांत राहा, विचार करा आणि त्याप्रमाणे वागा.

मीन (Pisces Zodiac)

महिलांनो, घरातील आर्थिक परिस्थिती सावरण्याची गरज आहे. त्यासाठी लहान-मोठ्या गोष्टींकडे बारकाईने पहा, फसगत होईल अशा योजनांमध्ये पैसा अडकवू नका. स्वतः खंबीर रहा. मानसिक ताणातून बाहेर पडायचा प्रयत्न करा. एप्रिल ते जुलै ह्या काळानंतर मात्र परिस्थिती सुधारेल.