Premium

शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवतात ‘या’ राशीचे लोक! तुम्ही तर नाही ना त्यांच्यापैकी एक?

असे म्हणतात की, काही लोक खूप भावनिक असतात तर काही लोक व्यावहारिक असतात, कोणी बुद्धिमान असते तर कोणी विचार न करता निर्णय घेतात.

enemy
शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवतात 'या' राशीचे लोक! ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स)

Nature by Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या राशीचा थोडा ना थोडा प्रभाव नक्की पडतो. एखाद्याच्या राशीवरून त्याच्या स्वभावाबाबत खूप काही जाणून घेता येते. असे म्हणतात की, काही लोक खूप भावनिक असतात तर काही लोक व्यावहारिक असतात, कोणी बुद्धिमान असते तर कोणी विचार न करता निर्णय घेतात. अशा प्रकारे काही लोक सहज दुसऱ्यांच्या चुका माफ करतात आणि काही लोक शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवण्यावर विश्वास ठेवतात असे मानले जाते. आज आम्ही अशाच राशींबाबत तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे जातक मोठे शत्रू ठरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शत्रुत्व ठेवतात या राशींचे लोक

मेष : ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे लोक खूप अहंकारी असतात. ते नेहमी स्वत:ला दुसऱ्यांपेक्षा चांगले आहोत हे दर्शवितात. या कारणामुळे कित्येकदा या व्यक्ती स्वत:चे नाते बिघडू शकतात. असे म्हणतात की, लोक कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्यांना चांगले मानत नाहीत. त्यामुळे ते मनातल्या मनात एखाद्यासोबत वैर धरतात आणि बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत असे मानले जाते.

हेही वाचा – ‘या’ सात राशींच्या व्यक्ती असतात उत्तम नवरोबा होण्यास पात्र? स्वभावाने असतात प्रेमळ, जोडीदाराची घेतात काळजी!

सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक तसे सहसा कोणावर नाराज होत नाहीत आणि विनाकारण वाद घालत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांच्या प्रकरणात दखल देते तेव्हा त्यांना प्रचंड राग येतो. असं म्हणतात की, हे लोक एखाद्याला शत्रू मानले तर मग त्याला कधीही माफ करत नाहीत. ते बदला घेण्यासाठी कोणतीही सीमा पार करू शकतात असे मानले जाते.

वृश्चिक : ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक अतिशय स्वार्थी असतात आणि आपल्याच कामात व्यस्त असतात. असे म्हणतात की, जेव्हा अशा व्यक्ती एखाद्यावर नाराज होतात तेव्हा सर्व सीमा ओलांडतात. एवढंच नव्हे तर आपल्या शत्रुत्वामुळे कित्येकदा नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे या राशींच्या लोकांपासून दूर राहिलेले चांगले असते असे मानले जाते.

हेही वाचा – येत्या ३५ दिवसांत बक्कळ पैसा कमावणार ‘या’ राशींचे लोक? नोकरी-व्यापारात होऊ शकतो मोठा लाभ!

धनू : ज्योतिषशास्त्रानुसार धनू राशीचे लोक कोणासोबतही बदला घेण्यासाठी उशीर करीत नाही. असे म्हणतात की हे लोक ज्यांच्यावर नाराज होतात त्यांच्यावर त्वरित बदला घेतात. एवढेच नव्हे तर हे लोक मैत्रीदेखील कमीच लोकांसोबत करतात आणि आपले काम आणि करिअरवर ठेवतात असे मानले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Worst enemy zodiac sign these people proved very dangerous enemies snk