ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाचे १७ जानेवारीला कुंभ राशीत गोचर झाले. यामुळे शनिदेवाचा पुर्नजन्म झाला आहे. कुंभ विषम राशी असल्याने शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीमध्ये कोणत्या पाऊलांनी प्रवेश करणार आहे, याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. कारण शनिदेव जेव्हा राशी परिवर्तन करतात, तेव्हा ते सर्व राशींसाठी सोने,तांबे,चांदी आणि लोखंडाच्या पाऊलांनी प्रवेश करतात. यामध्ये चांदी आणि तांब्याच्या पाऊलांवर शनिदेव शुभ लाभ देत असतात. गोचर कुंडलीत शनिदेव तांब्याच्या पाऊलांनी प्रवेश करणार आहेत, त्यांच्या राशींबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

धनु राशी

तुमच्या राशीनुसार शनिदेवाचे गोचर चांदीच्या पाऊलांवर झाले. कारण शनिदेव गोचर कुंडलीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे तुमच्यावरील साडेसाती दूर होण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या राशीतील स्वामी गुरु ग्रहाने हंस नावाचं राजयोग बनवून आगमन केलं आहे. तसेच शनिदेव तांब्याच्या पाऊलांनी प्रवेश करत आहेत. त्यामुळे तुमचं साहस मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. तसंच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळही मिळेल. तसंच तुम्हाला प्रचंड धनलाभही होण्याची शक्यता आहे. तु्म्ही सुरु केलेल्या कार्यातही लाभ मिळू शकतो. तुम्हाला या कालावधीत वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करु शकता. जे लोकं नोकरी करतात, त्यांना कार्यालयात नवीन जबाबदारी मिळू शकतो.

सिंह राशी

तुमच्या राशीत शनिदेव सप्तम मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनिदेवाचे गोचर तांब्याच्या पाऊलांवर झाले. तसंच तुमच्या गोचर कुंडलीमध्ये शनिदेव शश राजयोग बनवून बसलेत. या कालावधीत तुम्हाला जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. जर तुमचा व्यापार विदेशातही सुरु असेल, तर तुम्हाला चांगला धनलाभ मिळू शकतो. तसंच पार्टनरशिपच्या कामातही तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो. जे लोक अविवाहीत आहेत, त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

वृषभ राशी

तुमच्या राशीत शनिदेवाचे गोचर तांब्याच्या पाऊलांनी सुरु झाले. कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या दशम भावात प्रवेश करत आहे. यामुळे शश राजयोग बनणार आहे. तसेच शनिदेव दशम स्थानात शक्तीशाली होऊ शकतात. याचा अर्थ ते पूर्ण वेळ तुम्हाला शुभलाभ देऊ शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी-व्यवसायात मोठ्या प्रमाणावर यशप्राप्ती होऊ शकते.

(वरील लेख माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)