Yum Nakshatra Transit 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांच्या राशी, नक्षत्र आणि नक्षत्र पद परिवर्तनाला विशेष महत्व दिले जाते. परंतु पाश्चात्य देशांमध्ये प्लूटो (यम), युरेनेस (अरूण), नेपच्यून (वरूण) या ग्रहांच्या स्थितीचाही अभ्यास केला जातो. यम, वरूण आणि अरूण या ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. यम सध्या शनीच्या मकर राशीत असून २०३९ पर्यंत तो याच राशीत राहील. या ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी २० वर्षाचा कालावधी लागतो. या काळात यम नक्षत्र परिवर्तनही करतो.
पंचांगानुसार, ०३ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजून ०६ मिनिटांनी यम ग्रह श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून या नक्षत्रामध्ये तो १३ जुलै २०२६ पर्यंत असेल. त्यानंतर तो उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. २०२६ मध्ये यम केवळ या दोन नक्षत्रांमध्येच प्रवेश करेल. त्यामुळे यमाचे हे गोचर नक्कीच काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध होईल.
यमाचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींचे आयुष्य बदलणार
मकर (Makar Rashi)
यमाची बदलणाऱ्या स्थितीचा मकर राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी यशाचा मार्ग मोकळा होईल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या लोकांवर यमाच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून येईल. प्रेमसंबंध सुधारतील, अविवाहितांसाठी लग्नाचा प्रस्ताव येईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींना यम ग्रहाच्या बदलणाऱ्या स्थितीची शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींवर यम ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
