Yum Grah Vakri 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांच्या राशी, नक्षत्र आणि नक्षत्र पद परिवर्तनाला विशेष महत्व दिले जाते. परंतु पाश्चात्य देशांमध्ये प्लूटो (यम), युरेनेस (अरूण), नेपच्यून (वरूण) या ग्रहांच्या स्थितीचाही अभ्यास केला जातो. यम, वरूण आणि अरूण या ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. यम सध्या शनीच्या मकर राशीत असून २०३९ पर्यंत तो याच राशीत राहील. या ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी २० वर्षाचा कालावधी लागतो.
पंचांगानुसार, ०६ मे २०२६ रोजी यम संध्याकाळी ०५ वाजून ४७ मिनिटांनी वक्री होईल. जो १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत याच अवस्थेत राहील. तब्बल १६३ दिवस यम वक्री असेल. या ग्रहाच्या वक्री चालीचा १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना जबदस्त फायदा होईल.
वक्री यम ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींवर यम ग्रहाच्या वक्री अवस्थेचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील.
मकर (Makar Rashi)
यमाची बदलणाऱ्या स्थितीचा मकर राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमच्या आयुष्यातील ताण-तणाव दूर होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी यम ग्रहाची वक्री स्थिती खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना यम ग्रहाच्या बदलणाऱ्या स्थितीची शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

