Yum Grah Vakri 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांच्या राशी, नक्षत्र आणि नक्षत्र पद परिवर्तनाला विशेष महत्व दिले जाते. परंतु पाश्चात्य देशांमध्ये प्लूटो (यम), युरेनेस (अरूण), नेपच्यून (वरूण) या ग्रहांच्या स्थितीचाही अभ्यास केला जातो. यम, वरूण आणि अरूण या ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. यम सध्या शनीच्या मकर राशीत असून २०३९ पर्यंत तो याच राशीत राहील. या ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी २० वर्षाचा कालावधी लागतो.

पंचांगानुसार, येत्या ०६ मे रोजी २०२६ यम ग्रह संध्याकाळी ०४ वाजून ४७ मिनिटांनी वक्री होईल व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ११ वाजता मार्गी होईल. म्हणजे एकूण १६३ दिवस यम वक्री अवस्थेत राहील. या ग्रहाच्या वक्री चालीचा १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना जबदस्त फायदा होईल.

वक्री यम ‘या’ राशींचे नशीब बदलणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींवर यम ग्रहाच्या मार्गी अवस्थेचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. प्रत्येक कामात भरपूर यश मिळेल.

मकर (Makar Rashi)

यमाची बदलणाऱ्या स्थितीचा मकर राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी यमाची वक्री चाल खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींना यम ग्रहाच्या बदलणाऱ्या स्थितीची शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)