वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता कर्क राशीत मंगळ आणि शुक्र यांची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा विलास, वैभव, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. तर दुसरीकडे मंगळ हा शौर्य, धैर्य, क्रोध यांचा कारक मानला जातो. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या युतीचा प्रभाव १२ राशींवर पडणार आहे. परंतु या पैकी ३ राशी अशा आहेत ज्यांची या काळात चांगली प्रगती होऊ शकते. त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कर्क –
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शुक्र युती शुभ ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या लग्न स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहू शकते. तसेच मोठ्या लोकांशी तुम्ही ओळख बनवू शकता. त्याचबरोबर जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहू शकतील. हे गोचर आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी शुभ राहू शकते तर तुम्ही पैशांची बचत करु शकता. तसेच, अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतो. या काळात तुम्ही रागावू नका आणि आरोग्याबाबत थोडे जागरूक रहा.
मेष –
मंगळ आणि शुक्राची युती मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीतून चौथ्या स्थानी निर्माण होणार आहे. ज्याला संपत्ती, वाहन, मातेचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या आईची साथ मिळू शकते. दुसरीकडे, हे गोचर आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी शुभ राही शकते ज्यामुळे आणि तुम्ही जास्त पैसे वाचवू शकता. तसेच ज्यांचा व्यवसाय मालमत्ता, स्थावर मालमत्ता, जमीन-संपत्तीशी संबंधित आहे, त्यांना चांगले लाभ मिळू शकतो.
वृश्चिक –
मंगळ आणि शुक्राची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी ही युती होणार आहे. म्हणूनच या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. यासोबतच तुम्ही नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवासही करू शकता. दुसरीकडे, व्यवसाय करणाऱ्या लोकांचा या काळात जास्त नफा होऊ शकतो. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करू शकता. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे ते या काळात तसा निर्णय घेऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.