News Flash

राशीभविष्य

a

मेष

मेष : ध्येय गाठाल

चंद्र मंगळ शुक्र ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. स्वतङ्मच्या हिमतीवर ठरवलेल्या गोष्टी करणे अवघड होणार नाही. इतरांवर अवलंबून राहण्याचा कालावधी संपेल. कोणाची मनधरणी आता करावी लागणार नाही. व्यावसायिकदृष्ट्या हक्काचे यश मिळेल. नियोजनबद्ध केलेल्या कामांमध्ये त्रुटी राहणार नाहीत. कष्टाचे प्रमाण वाढले तरी फायद्याचे प्रमाण वाढलेले असेल. नोकरदार वर्गाला अगदी धारेवर धरणाऱ्या गोष्टींचा त्रास कमी होईल. वरिष्ठांशी  होणारा वाद मिटेल. आर्थिकदृष्ट्या ध्येय गाठाल. सामाजिक माध्यमाचा वापर योग्य कारणासाठी करा. नातेवाइकांशी कार्यक्रमानिमित्त भेट होईल. वैवाहिक जीवनात मनासारखे वातावरण राहील. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. मानसिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींकडे कल ठेवा. शारीरिक त्रास कमी होईल.

शुभ दिनांक : १ , २

महिलांसाठी : चांगल्या संधी प्राप्त होतील.

स्मिता अतुल गायकवाड
b

वृषभ

वृषभ : अडचणी दूर होतील

१ ऑगस्ट रोजी हत्ती गेला शेपूट राहिले असा एक दिवसाचा क्रम राहील. या दिवशी शांत राहूनच दिवस ढकला. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी केलेल्या कामात फायदा मिळेल. किरकोळ असणाऱ्या अडचणी कमी होतील. थोरामोठ्यांच्या कृपेने अनेक संधी प्राप्त होतील. सैन्य दलातील अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच अधिकार पदावर काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला कामात उत्साह वाटेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत अग्रेसर राहाल. राजकीय क्षेत्रात घेतलेली आघाडी आणि वाढत असलेला नावलौकिक यातून आपले मनसुबे पूर्ण करून घेता येतील. भावंडांशी हितगुज साधणे आनंददायक वाटेल. सप्ताहात बऱ्यापैकी अडचणी दूर होतील. कुटुंबाची जबाबदारी पार पाडाल. आध्यात्मिक गोष्टीत मन गुंतेल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्ती वाढेल.

शुभ दिनांक : ३ , ४

महिलांसाठी : स्वतङ्मचे कामकाज व कुटुंब या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्याल.

स्मिता अतुल गायकवाड
c

मिथुन

मिथुन :  ताण कमी होईल

दिनांक २, ३ रोजी नवे व्याप स्वतङ्महून काही वाढवू नका. नियमांच्या बाहेर असलेल्या गोष्टींना थारा देणे टाळा. वादविवादापासून लांब राहा. व्यापारी वर्गाला व्यापाराचे एखादे नवे क्षितिज गाठता येईल. गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळेल. मागे काही दिवसात आलेल्या अडथळ्यांचे प्रमाण कमी होऊ लागेल. कामावर आपली पकड पुन्हा बसू लागेल. व्यावसायिकदृष्ट्या सुधारित अवस्था येईल. नोकरदार वर्गाला नवे काही शिकण्याचा उपयोग होऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या मनावरचा ताण कमी होईल. सामाजिक क्षेत्रात स्वतङ्मच्या कार्य कौशल्याचा चांगला उपयोग करून घेता येईल. मित्रपरिवाराच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. जुन्या विकारातून सुटका होईल.

शुभ दिनांक : १, ५

महिलांसाठी : आगामी काळासाठी केलेली तरतूद योग्य असेल.

स्मिता अतुल गायकवाड
d

कर्क

कर्क : कामकाजात गती राहील

पूर्वार्धात बऱ्याच घडामोडी होत राहतील. मात्र दिनांक ५, ६ रोजी इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. या दोन दिवशी एखादी गोष्ट आवडली नाही तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या स्वतङ्मचे वेगळे आडाखे बांधता येतील. यशाचे प्रमाण वाढते असेल. एकूणच कामकाजात गती राहील. अपेक्षित उत्पन्नाचे मार्ग दिसू लागतील. नोकरदार वर्गाची कार्यशक्ती चांगली राहील. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. खर्चीक गोष्टींना आवर घातल्यास आर्थिक बचत होईल. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या कारकिर्दीचा प्रभाव राहील. मैत्रीचे नाते चांगले असले तरी मैत्रीच्या नात्यांमध्ये अतिरेक टाळा. कौटुंबिक जीवनात शक्य तेवढा सूर जोडण्याचा प्रयत्न करा. धार्मिक गोष्टींसाठी उत्साही असाल. आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

शुभ दिनांक : २, ३

महिलांसाठी : स्वतङ्मसाठी वेळ द्या.

स्मिता अतुल गायकवाड
e

सिंह

सिंह : उत्साह वाढेल

भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण शुभ फलदायी ठरेल. एरवी नियोजन करूनही काही गोष्टी वेळेवर होत नव्हत्या, सध्या ती स्थिती बदलणारी असेल. स्वतङ्मच्या कौशल्याचा चांगला ठसा उमटवता येईल. व्यापारी उलाढाल वाढण्यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. पुढाकार घेऊन केलेल्या गोष्टींमध्ये यश मिळेल. ग्राहकांचा र्पांठबा उत्तम राहील नोकरदार वर्गाला वेतनवाढीचा लाभ होईल. काहींना नव्या नोकरीचे संकेत मिळतील. आर्थिकदृष्ट्या प्रगती उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मित्र परिवाराचा सहवास लाभेल. भावंडाविषयी अनुकूल वार्ता मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या आनंदात सहभागी व्हाल. मानसिकदृष्ट्या उत्साह वाढेल. गोड-धोड खाण्याचे प्रसंग येतील. आरोग्य उत्तम राहील.

 शुभ दिनांक : १ , ६ 

महिलांसाठी : नियोजनात्मक गोष्टी कराल.

स्मिता अतुल गायकवाड
f

कन्या

कन्या : विचारांना प्राधान्य मिळेल

शुभ ग्रहांची अनुकूलता प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटेल, तशीच घडवून आणेल. स्वतङ्मच्या मताला प्राधान्य मिळेल. उशिरा का होईना, कष्टाचे फळ साध्य होईल. नव्या जोमाने कामाला लागाल. व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला दाही दिशांनी यश खुणावत आहे. हे लक्षात घ्या. संधीचे सोने करा. सरळ मार्गी व्यवहारातून बराच फायदा होईल. नोकरदार वर्गाला दीर्घकालीन रखडलेल्या निर्णयांना गती मिळवता येईल.

तुमच्या विचारांना प्राधान्य मिळेल. पैशांच्या बाबतीत मागे झालेली कुचंबणा दूर होईल. राजकीय क्षेत्रात सत्तेसाठी केलेली धावपळ कामी पडेल. मुलांचे सहकार्य मिळेल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्याचे प्रश्न मिटू लागतील. वैवाहिक जीवन सुखाचे असेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्याबाबतीत वाटणारी काळजी मिटेल.

 शुभ दिनांक : २ , ३

महिलांसाठी : चांगल्या कल्पना राबवण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग होईल.

स्मिता अतुल गायकवाड
g

तूळ

तूळ : आलेख उंचावेल

सप्ताहाच्या पूर्वार्धात घाई करून निर्णय घेऊ नका. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. भावनिक गोष्टींपेक्षा व्यावहारिक गोष्टींना महत्त्व देणे चांगले राहील. कायदा क्षेत्रात एक पाऊल मागे आलेले उत्तम असेल. अनुभवी लोकांचा सल्ला मिळाल्याने व्यापारी वर्गाला खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे सोपे जाईल.

कामाचे नवे तंत्र आत्मसात करता येईल. नोकरदार वर्गाला एखादी आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्यातूनच स्वत:ला सिद्ध करता येईल. आर्थिकदृष्ट्या आलेख उंचावेल. सामाजिक संस्थांशी जोडलेले संबंध उपयोगी ठरतील. भावंडांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. शेजारधर्माला मदत कार्य कराल. मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत कोणताही अतिरिक्त अतिरेक करणे टाळा.

शुभ दिनांक : १, ५

महिलांसाठी : खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

स्मिता अतुल गायकवाड
h

वृश्‍चिक

वृश्चिक : सहनशीलता ठेवा

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. कोणत्याही गोष्टीच्या मर्यादा पाळण्यावर भर द्या. सारासार विचार जागृत ठेवून कृती करा. बोलण्याच्या भरात वाहवत जाऊ नका. व्यावसायिकदृष्ट्या काळ, काम, वेग यांचे अचूक गणित कसे साधता येईल हे बघा. आवश्यक असेल तेवढीच गुंतवणूक करा. भागीदारी व्यवसायाचा सध्या तरी विचार करू नका.

नोकरदार वर्गाला परिश्रमात सातत्य ठेवावे लागेल. अनोळख्या व्यक्तींशी हातमिळवणी करणे टाळा. उधारी करू नका.

पैशांचे व्यवहार जपून करा. सामाजिक क्षेत्रात मर्यादा पाळण्यावर भर द्या. नातेवाईकांशी संवादातून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिकदृष्ट्या सहनशीलता ठेवा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : २, ३ 

महिलांसाठी : प्रयत्नवादी राहा.

स्मिता अतुल गायकवाड
i

धनु

धनू : नियोजन करा

सध्या ग्रहमानाची साथ नसली तरी वाईटही नाही. गृहीत धरून कोणतीही गोष्ट करणे योग्य राहणार नाही. आपले तेच खरे करण्याची जिद्द बदलावी लागेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित फलप्राप्ती मिळवण्यासाठी कष्ट वाढवावे लागतील. व्यावसायिकदृष्ट्या जास्तीच्या फायद्याचा विचार करू नका.

कमीत कमी तोटा होणार नाही याची काळजी घ्या. स्वतंत्र कार्यप्रणाली तयार करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वेळ जाणार नाही याची खबरदारी घ्या. आर्थिकदृष्ट्या नियोजन करा. सामाजिक क्षेत्रात सामोपचाराने तोडगा काढा. सासरकडील मंडळींना समजून घ्या. गैरसमज टाळा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. मानसिक शांतता राखा. आरोग्याकडे लक्ष द्या.

शुभ दिनांक : १, ५

महिलांसाठी : तणावमुक्त राहा.

स्मिता अतुल गायकवाड
j

मकर

मकर : देवाणघेवाण उत्तम

दिनांक ५ आणि ६ रोजी सकारात्मक राहा. दुसऱ्यांच्या बोलण्यावर पटकन कृती करणे टाळा. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नाण्याच्या दोन बाजू नेहमी तुम्ही लक्षात ठेवता. हा गुणधर्म तुमच्यासाठी यशाच्या शिखरावर नेणारा असेल. व्यावहारिकदृष्ट्या देवाणघेवाण उत्तम राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरदार वर्गाला नियमांचे पालन केल्यास मानसिक ताणतणाव जाणवणार नाही. आर्थिकदृष्ट्या सप्ताह चांगल्या उलाढालीचा असेल.

सार्वजनिक ठिकाणी परिवर्तन घडवून आणाल. मित्रांमार्फत आलेल्या प्रस्तावाच्या जास्त आहारी जाऊ नका. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. कुटुंबाची साथ राहील. मनोबल वाढेल. प्रकृतिस्वास्थ्य ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : २, ३

महिलांसाठी : कार्यमग्न राहाल.

स्मिता अतुल गायकवाड
k

कुंभ

कुंभ : आत्मविश्वास वाढेल

अगदी आखून ठेवल्याप्रमाणे गोष्टी घडत आहेत असा ग्रहांचा सूर असेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन गोष्टी करण्यास संधी प्राप्त होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक स्तर लक्षात घेता एखादे नवीन करार मिळण्याचे संकेत मिळतील.

चढउताराचा सामना कमी होईल. नोकरदार वर्गाला तुमचा चिवटपणा स्थिर राहण्यास मदत करेल. अनेक गोष्टींचा तर्कवितर्क करणे सोपे जाईल. खर्चाची बाजू लक्षात घेतल्यास आर्थिकदृष्ट्या अडचण येणार नाही. राजकीय क्षेत्रात स्वकर्तृत्वाला वाव मिळेल. वैवाहिक स्तरावर मतभेद बाजूला होतील. घरगुती वातावरण आनंदी असेल. द्विधा अवस्था कमी होईल. शारीरिकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्याल.

शुभ दिनांक : ४, ५ 

महिलांसाठी : मोकळीक मिळेल.

स्मिता अतुल गायकवाड
l

मीन

मीन : शुभ गोष्टी घडतील

चांगली गोष्ट करण्यासाठी असलेला संकल्प यशस्वी होईल. वेळेची वाट बघत न बसता कृतीवर भर देणे तुम्हाला योग्य वाटेल. बऱ्याच दिवसांपासून निर्णय घेणे अवघड वाटत असले, तरी सध्या ते धाडस वाढणारे आहे हे निश्चितच. त्यासाठी मिळणारे यश द्विगुणित असेल. छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांना शुभसंकेत मिळतील. थांबलेले व्यवहार पुन्हा चालू होतील.

नोकरदार वर्गाचा वरिष्ठांविषयी निर्माण होणारा ताण कमी होईल. त्यामुळे कामात लक्ष लागेल आर्थिक बाबतीत जोडीदाराची मदत मिळेल. राजकीय क्षेत्रातील ध्येय सफल होईल. भावंडांविषयी असलेला राग ताणून धरू नका. नातेवाईकांशी वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे टाळा. एकूणच सप्ताहात शुभ गोष्टी घडतील. आरोग्याविषयीची तक्रार कमी होईल.

शुभ दिनांक : १, ४

महिलांसाठी : स्वत:साठी वेळ द्याल.

स्मिता अतुल गायकवाड
Just Now!
X