News Flash

बुकबातमी : संग्रहमूल्य! 

जुनं महात्मा गांधींच्या ‘यंग इंडिया’ या नियतकालिकाच्या पहिल्या दोन वर्षांचं बाड- १९२२ साली प्रकाशित झालेलं... पण त्यावर गांधीजींची सहीबिही नव्हती.

दोन लाख चौसष्ट हजार रुपयांना नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक विकलं गेलं नुकतंच… या पुस्तकाचे हक्कसुद्धा १९४६ मध्ये (ते पहिल्यांदा प्रकाशित झालं तेव्हा) एवढ्या रुपयांना विकले गेले नसते! पण आता या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची- आणि म्हणे खुद्द लेखक जवाहरलाल नेहरू यांची सही असलेली- प्रत एवढ्या किमतीला विकली गेली. त्याहीपेक्षा जुनं महात्मा गांधींच्या ‘यंग इंडिया’ या नियतकालिकाच्या पहिल्या दोन वर्षांचं बाड- १९२२ साली प्रकाशित झालेलं… पण त्यावर गांधीजींची सहीबिही नव्हती. तरीही ते एक लाख २० हजार रुपयांना विकलं गेलं, हेही नुकतंच. ‘प्रिन्सेप्स’ या लिलावघरानं १५ जुलैच्या संध्याकाळपर्यंत ऑनलाइन लिलावात एकंदर ६२ पुस्तकं विकायला काढली होती. लिलावाचं नावच ‘नॅशनलिझम बुक ऑक्शन’.  मुस्लीम लीगच्या आग्रा (१९१३) अधिवेशनातलं इब्राहीम रहिमतुल्ला यांचं अध्यक्षीय भाषण (पृष्ठे ३३, सर्वोच्च बोली लागली ६,००० रुपयांची) किंवा सरोजिनी नायडू यांचा १९१७ साली प्रकाशित झालेला ‘द ब्रोकन विंग’ हा कवितासंग्रह (सर्वोच्च बोली ४५,६०० रु.) इथपासून ते १९६९ मध्ये प्रकाशित झालेलं ‘गांधी अ‍ॅण्ड बॉम्बे’ हे के. गोपालस्वामी लिखित पुस्तक (सर्वोच्च बोली ११,४०० रु.) असा या लिलावाचा आवाका. लिलावघरांबद्दल बरं बोललं जात नाही, तरीही पुस्तकांवरल्या स्वाक्षऱ्या खऱ्याच की आणखी कशा याची पर्वा न करता, स्वाक्षरी असलेल्या पुस्तकांना अधिक बोली लागल्याचं इथं दिसलं. बऱ्याच पुस्तकांची अंदाजित किंमत ५,००० ते १५,०००रु. ठेवण्यात आली होती, अशांपैकी ३८ पुस्तकं सहा ते ११ हजार रुपयांची बोली मिळवून गेली. या पुस्तकांमधली मूल्यं विस्मृतीत जात असताना, पुस्तकांचं संग्रहमूल्य मात्र वाढतंयच, असं दिसतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:06 am

Web Title: book news collection price akp 94
Next Stories
1 वेदनेची घरंदाज बाजारपेठ
2 नेहरूंचा नायक…
3 आव्हाने पेलण्यासाठी कानमंत्र…
Just Now!
X