आकडे म्हणजे आकडे! बहुमतच जिंकणार.. आणि अल्पमत? ते हरलं असंच समजायचं का? की, ते ‘आहे’ याकडे लक्ष द्यायचं? हा प्रश्न इतका गहन ठरतो की, तो ज्याच्या-त्याच्या सदसद्विवेकबुद्धीवरच सोडून देणं बरं. पण एका पुस्तकासंदर्भात हाच प्रश्न पुन्हा उद्भवला आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सबा नकवी पत्रकार. आधी ‘इंडिया टुडे’, मग ‘आउटलुक’मध्ये नोकरी आणि आता ‘इंडियन एक्स्प्रेस’सह अनेक वृत्तपत्रांत प्रासंगिक लिखाण करतात. भाजपविषयक वार्ताकन करणाऱ्या पत्रकार आणि पुढे स्तंभलेखक म्हणून गेली ३० वर्ष त्यांनी भाजपचा प्रवास जवळून पाहिला आहे. या अनुभवसिद्ध निरीक्षणांवर आधारलेलं पुस्तक म्हणजे ‘शेड्स ऑफ सॅफरॉन’.

हे पुस्तक ‘अमेझॉन (डॉट इन)’ या संकेतस्थळावर ‘नंबर वन बेस्टसेलर’ ठरलंय, असा दावा परवाच्या बुधवारी- १८ जुलै रोजी- पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ‘वेस्टलॅण्ड प्रकाशना’नं ट्वीटद्वारे केला. पुस्तक बाजारात आलं, त्याला बरोब्बर एक महिना झाल्यावर हा दावा करण्यात आला. मुद्दा तो नाही. भाजप- संघ परिवारातील भरपूर जणांशी बोलून लिहिलेलं आणि ‘मोदींचा ‘व्हायब्रंट गुजरात’ प्रचार वाजपेयींच्या ‘इंडिया शायनिंग’सारखा अपयशी ठरला नाही, तो का?’ यासारखे मर्मग्राही प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरंही देणारं हे पुस्तक वाचकांना आवडतं आहे, असं चित्र ‘गुडरीड्स’ या अन्य संकेतस्थळावरही दिसतं. पण बातमी अशी की, अ‍ॅमेझॉनवर या पुस्तकाची जी सात वाचक-परीक्षणं आहेत त्यांपैकी चार या पुस्तकाला दिलखुलास दाद देणारी आहेत आणि बाकीची तीन, ‘पैसे वाया घालवू नका’ वगैरे सूर लावणारी आहेत. चौघांनी या पुस्तकाला ‘पाच तारांकित’ ठरवलंय तर बाकीच्या तिघांनी ‘एकच तारा’ दिलाय. हे जे ‘बाकीचे’ वाचक आहेत त्यांचं प्रमाण ४३ टक्के भरतं. पण पुस्तकाचा दर्जा मान्य करणारे वाचक आहेत ५७ टक्के!

.. आता इथंही बहुमतच खरं मानायचं की बाकीच्या ४३ टक्क्यांकडेही पाहायचं? ‘बुकमार्क’मध्येच या पुस्तकाचं सविस्तर परीक्षण येईपर्यंत तरी तुमचं तुम्हीच ठरवा!

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta book review
First published on: 21-07-2018 at 02:35 IST