रामायणाविषयीच्या एका साध्या प्रश्नाचे उत्तर दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजूषेत एका मुलास देता आले नाही, हे पाहून अस्वस्थ झालेल्या अनंत पै यांनी भारतीय मुलांना देशी सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देण्यासाठी ‘अमर चित्र कथा’ ही ‘कॉमिक माला’ सुरू केली, त्यास आता तब्बल ५४ वर्षे झाली. या काळात मिथ्यकथांपासून पुराणकथा ते थोरांच्या प्रेरककथा ‘अमर चित्र कथा’ अर्थात ‘एसीके’ने २० भाषांतून भारतीय मुलांना सांगितल्या. मधल्या काळात निखळ रंजनात्मक आणि विज्ञानाला स्थान देणाऱ्या बाल-नियतकालिकांच्या चलतीचा काळ आलाही, पण ‘अमर चित्र कथा’चा प्रभाव संपला असे झाले नाही. आठ ते १४ – अर्थात किशोर/कुमार वयोगटातील मुले हा ‘अमर चित्र कथा’चा वाचकवर्ग. मात्र, आता ‘अमर चित्र कथा’ने तो विस्तारण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. तेच अधोरेखित करणारी बातमी सरत्या आठवडय़ात आली. बातमी अशी की, ‘हार्पर कॉलिन्स’ या इंग्रजीतील बडय़ा प्रकाशन संस्थेच्या सहकार्याने ‘अमर चित्र कथा’ नव्या रूपात नव्या वाचकांसाठी प्रकाशित होणार आहे! इथे, आता आधीच्या स्वरूपात ‘अमर चित्र कथा’ नसणारच का, असा प्रश्न पडलेल्यांसाठी खुलासा : ‘एसीके’चे आधीचे रूप कायम राहणारच आहे! पण नवा वाचकवर्ग- जो किशोर/ कुमार अवस्थेच्या पुढचा आहे, त्याच्यासाठी हा नवा अवतार ‘एसीके’ घेणार आहे. या वाढत्या वयातल्या, युवावस्थेचा उंबरठा ओलांडलेल्या वाचकांसाठी लोककथांची माला ‘हार्पर कॉलिन्स’तर्फे ‘अमर चित्र कथा’ प्रसिद्ध करणार आहे. ‘एसीके’त याआधी किशोर वाचक डोळ्यांपुढे ठेवून सादर केलेल्या लोककथाच, परंतु संपूर्णत: नव्या कथनशैलीत या नव्या लोककथामालेत वाचायला मिळतील. भारतीय जनमानसात पिढय़ान्पिढय़ा रुजून राहिलेल्या लोककथांचा समावेश त्यात असेल, असे याच आठवडय़ात ‘हार्पर कॉलिन्स’च्या संकेतस्थळावर झळकलेल्या आणि विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या- ‘बुद्धिस्ट स्टोरीज्’, ‘फनी फोकटेल्स’, ‘टेल्स ऑफ विट अ‍ॅण्ड विज्डम’- या पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरून तरी दिसते.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट