|| अविनाश कोल्हे

लोकशाही संकेत अव्हेरणारी राज्यघटना बदलावी की नाही, यावर चिली या दक्षिण अमेरिकी देशात गतवर्षी सार्वमत घेतले गेले. त्याचा कौल सकारात्मक आल्यानंतर यंदा एप्रिलमध्ये घेतलेल्या निवडणुकीत लोकशाहीवादी मंडळींची सरशी झाली. या वर्तमान घडामोडींचे इतिहासातील धागे दाखवून देणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज
Loksatta sanvidan bhan Constitution India that is Bharat Federation India
संविधानभान: इंडिया हाच भारत!

लॅटिन अमेरिकेतील चिमुकला देश चिली (लोकसंख्या : १.८२ कोटी, राजधानी : सान्तियागो) आज चच्रेत आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात या देशात झालेल्या घटना समितीच्या निवडणुकांत डाव्या, पुरोगामी विचारांचे उमेदवार मोठय़ा प्रमाणात निवडून आले. आता हे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी चिली या देशाची उजवी, प्रतिगामी राज्यघटना बदलतील. आज तेथे लागू असलेली राज्यघटना लष्करप्रमुख ऑगस्तो पिनोचे याने लादली होती. तेव्हापासून हा चिमुकला देश हुकूमशहाने लादलेल्या, लोकशाही संकेत पायदळी तुडवणाऱ्या राज्यघटनेप्रमाणे कारड्टार करत होता. सध्या लागू असलेली राज्यघटना १९८० साली लादली होती. आता यात मूलगामी बदल होणार आहेत. म्हणूनच जगड्टारचा लोकशाहीप्रेमी समाज चिलीच्या जनतेबरोबर जल्लोष करत आहे.

ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नव्हती. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये तेथे राज्यघटना बदलण्याची गरज आहे का, या मुद्दय़ावर सार्वमत घेण्यात आले. राज्यघटना बदलली पाहिजे यासाठी तेथील लोकशाहीवादी मंडळी गेली अनेक दशके झगडत होती. शेवटी गेल्या वर्षी याविषयी सार्वमत घेण्यात आले. त्यानुसार यंदा एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या, ज्यात लोकशाहीवादी शक्तींची सरशी झालेली आहे. आता निवडून आलेल्या १५५ विजयी उमेदवारांपैकी फक्त ३८ उमेदवार उजव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, या १५५ विजयी उमेदवारांपैकी ७७ महिला, तर ७८ पुरुष आहेत! आज एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक सुरू असताना जगात जवळजवळ कोणत्याच देशात महिलांनी राजकारणात असे ५० टक्के प्रतिनिधित्व मिळवले नव्हते. इंग्लंडमध्ये १९७९-१९८९ दरम्यान मार्गारेट थॅचर पंतप्रधानपदी होत्या. अमेरिकेत अजूनही राष्ट्राध्यक्षपदी महिला विराजमान झालेली नाही. एवढय़ा वर्षांनी आता जानेवारी २०२१ मध्ये कमला हॅरिस उपाध्यक्ष झालेल्या आहेत.

हे तपशील बघितले की, चिलीच्या जनतेचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. सप्टेंबर १९७० मध्ये याच जनतेने असेच कौतुकाचे पाऊल उचलले होते. त्या वर्षी तेथे झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत साल्वोदोर आलेंदे (आयंदे) यांच्या नेतृत्वाखाली ‘पॉप्युलर युनिटी’ या डाव्यांच्या आघाडीने निवडणूक जिंकली होती. ४ सप्टेंबर १९७० रोजी निवडणुकीचा निकाल लागला. आलेंदे (वय : ६५ वर्षे) जिंकले म्हणून त्या रात्री चिलीच्या रस्त्यारस्त्यांवर लोक रात्रड्टार आनंदाने नाचले. डाव्या विचारांचे आलेंदे राष्ट्राध्यक्ष होऊ नयेत यासाठी शेवटपर्यंत पडद्याआडून ड्टारपूर प्रयत्न झाले होते. १५ सप्टेंबर १९७० रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सीआयए या त्यांच्या गुप्तचर संस्थेचे संचालक रिचर्ड हेल्म्स यांना आदेश दिले होते की, काय वाट्टेल ते झाले तरी आलेंदे सत्तेत येणार नाहीत याची तजवीज करा. शेवटी ३ नोव्हेंबर १९७० रोजी लॅटिन अमेरिकेच्या इतिहासात जे घडले नव्हते ते घडले. अमेरिकेच्या आधिपत्याखाली असलेल्या लॅटिन अमेरिकेतील एका चिमुकल्या देशात डावा नेता मतपेटीद्वारे सत्तेत येतो म्हणजे काय! अमेरिकेने केवढा थयथयाट केला असेल याची कल्पनाच केलेली बरी! अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि कुटिल नीतीत प्रवीण असलेले हेन्री किसिंजर म्हणाले होते की, ‘आय डु नॉट सी व्हाय वी नीड टु स्टॅण्ड बाय अॅरण्ड वॉच अ कण्ट्री गो कम्युनिस्ट डय़ू टु द इर्रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट्स ओन पीपल.’ म्हणे बेजबाबदार लोक! नेमका असाच प्रकार ड्टारतातही झाला होता. १९५७ साली झालेल्या निवडणुकांत केरळ राज्यात कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आले आणि ई.एम.एस. नंबुद्रीपाद मुख्यमंत्री झाले होते. पंडित नेहरूंच्या सरकारने अवघ्या दोन वर्षांतच, म्हणजे १९५९ साली अनुच्छेद ३५६ चा वापर करून हे सरकार बडतर्फ केले होते.

चिलीमध्ये तेव्हा नेमके काय आणि कसे घडले, हे समजून घ्यायचे असेल तर दिल्लीच्या ‘लेफ्टवर्ड’ प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले ‘चिली : द अदर सप्टेंबर ११’ हे छोटेखानी पुस्तक जवळ करावे लागते. या पुस्तकात एकूण दहा लेख आहेत. एरियल डॉर्फमन, पाब्लो नेरुदा, फिडेल कॅस्ट्रो, खुद्द साल्वोदोर आलेंदे, आलेंदे यांची कन्या बिएट्रिस आलेंदे, चिलीचा प्रसिद्ध कवी-नाटय़कर्मी व्हिक्टर जारा, त्याची पत्नी जोन जारा आदींचे लेख आहेत. हे लेख म्हणजे ११ सप्टेंबर १९७३ (म्हणजे चिली या चिमुकल्या देशाचे ‘९/११’) रोजी लष्करशहा ऑगस्तो पिनोचे याने अमेरिकेच्या सीआयएच्या मदतीने केलेल्या बंडानंतर लिहिलेले लेख/ड्टाषणे आहेत. या बंडात आलेंदे यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. नंतर लष्करशहा पिनोचेने अमानुष अत्याचार करून चिलीत दहशत पसरवली आणि तब्बल १७ वष्रे, म्हणजे १९९० पर्यंत सत्ता उपड्टोगली. लष्करशहा पिनोचेने केलेल्या अत्याचारांवर ग्रीक-फ्रेंच सिनेदिग्दर्शक कॉन्स्टॅन्टिनोस कोस्टा-गावरस यांनी १९८२ साली ‘मिसिंग’ हा सिनेमा बनवला होता.

चिलीमधील लोकनियुक्त राष्ट्राध्यक्षाला गोळ्या घालून मारण्याची अमेरिकेला का गरज ड्टासली? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर हे पुस्तक वाचले पाहिजे. यातील पहिला लेख एरियल डॉर्फमन यांचा आहे. डॉर्फमन म्हणजे चिलियन-अमेरिकी नाटककार/कादंबरीकार. त्यांचे फार गाजलेले नाटक म्हणजे ‘डेथ अॅ ण्ड द मेडन’. जेव्हा अमेरिकेवर इस्लामी दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी (अमेरिकेचे म्हणजे पर्यायाने सर्व जगाचे ‘९/ ११’) हल्ला केला तेव्हा डॉर्फमन अमेरिकेत होते. ही घटना दूरचित्रवाणीवर बघत असताना त्यांच्या मनात आधीच्या ‘९/११’च्या (आलेंदेंचा खून झाला होता तो ११ सप्टेंबर १९७३) आठवणी जाग्या झाल्या. ते लिहतात, ‘त्या दिवशी न्यू यॉर्कमधील आईवडील, ड्टाऊबहीण हातात छायाचित्रं घेऊन सैरावैरा आपापल्या नातेवाईकांना शोधत होते. नेमकं तसंच ११ सप्टेंबर १९७३ रोजी सान्तियागोतील लोक सैरावैरा धावत होते, आपापल्या नातेवाईकांना शोधत होते. पिनोचेच्या सैनिकांनी डाव्या विचारसरणीच्या तरुणांची मोठय़ा प्रमाणात धरपकड सुरू केली होती, काहींना तर दिसताच क्षणी गोळ्या घातल्या होत्या. जसं न्यू यॉर्कमधील लोक म्हणत होते की आमच्या देशात असं घडणं शक्यच नाही, तेव्हा तसंच सान्तियागोतील लोक म्हणत होते. पण दुर्दैवानं दोन्ही घटना खऱ्या होत्या.’

या पुस्तकात डावे, पुरोगामी कवी पाब्लो नेरूदा यांची कविता आहे. नेरूदा म्हणजे १९७१ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेले चिलीचे कवी. चिलीत लष्करबंड झाले तेव्हा ते कर्करोगग्रस्त होते आणि सान्तियागोच्या रुग्णालयात उपचार घेत होते. आलेंदे आणि नेरुदा जवळचे मित्र. आपल्या मित्राचा झालेला अमानुष खून नेरुदांना सहन झाला नाही. लष्करी बंडानंतर अवघ्या १५ दिवसांत, म्हणजे २५ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी ‘आय बिगीन बाय इन्व्होकिंग वॉल्ट व्हिटमन’ या शीर्षकाची कविता लिहिली. व्हिटमन (१८१९-१८९२) हे अमेरिकेचे नामवंत मानवतावादी कवी आणि पत्रकार. अमेरिकी मन समजून घ्यायचे असेल तर व्हिटमन यांचे लेखन समजून घ्यावे लागते, अशी त्यांची कीर्ती. पाब्लो नेरुदांनी ही कविता व्हिटमन यांना उद्देशून लिहिली : ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो, म्हणून तू माझा ड्टााऊ ठरतोस, तुझ्या राखाडी हातांसह- हे बुजुर्ग वॉल्ट व्हिटमन!.. म्हणून तुझ्या खास साहाय्याने- तुझ्या शब्दांच्या आधारानेच, आम्ही रक्तपिपासू राष्ट्राध्यक्ष निक्सनला मुळासकट उखडून टाकू..’ धारदार राजकीय कविता कशी असते / असावी याचा वस्तुपाठ म्हणजे ही कविता!

सकाळी सहा वाजता राष्ट्राध्यक्ष साल्वोदोर आलेंदे यांच्या घरावर पिनोचेच्या सैनिकांचा हल्ला सुरू झाला. आलेंदे अवघ्या ४० निष्ठावंत सैनिकांसह दुपारी दोन वाजेपर्यंत लढले. पिनोचेच्या सैनिकांनी गोळीबारात त्यांच्या शरीराची चाळणी केली. यादरम्यान आलेंदेंनी राष्ट्राला उद्देशून रेडिओवरून शेवटचे ड्टााषण केले. ते या पुस्तकात आहे. ते म्हणाले होते : ‘‘आपल्या मायड्टाूमीला प्रिय असलेल्या तत्त्वांच्या रक्षणासाठी मी माझे प्राणही द्यायला तयार आहे. पण नामुष्की त्यांच्यावर ओढवेल, ज्यांनी दिलेला शब्द पाळला नाही अन् सशस्त्र दलांची मूलड्टाूत शिकवण अव्हेरली. ही मंडळी आपल्याला चिरडून टाकतीलही, पण उद्याचे जग जनसामान्यांचे, कामगारांचे असेल. मानवता त्यांचे आयुष्य अधिक सुस करण्याच्या दिशेने प्रयत्नरत असेल, अशी मला आशा आहे.’’

या पुस्तकात व्हिक्टर जारा यांची कविता आहे. ११ सप्टेंबर १९७३ रोजी व्हिक्टर जारा यांना अटक केली गेली आणि नंतर त्यांनाही गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या कवितेतील काही ओळी : ‘आपल्या राष्ट्राध्यक्षाचे, आपल्या साथीचे रक्त बॉम्ब वा बंदुकांहूनही अधिक सामर्थ्यांने प्रहार करेल..’ फिडेल कॅस्ट्रो यांचे या पुस्तकातील १८ पानी ड्टााषण मुळातूनच वाचले पाहिजे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यापासून अवघ्या ९० मैलांवर असलेल्या छोटय़ाशा क्युबा या देशात फिडेल कॅस्ट्रो यांनी १९५३ साली क्रांती केली. त्यांचे आलेंदेंशी खास मैत्र होते. कॅस्ट्रो यांच्या ड्टााषणात- नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्या पाश्चात्त्यांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अर्थकारण, आर्थिक मोहापायी होत असलेले अन्याय/अत्याचार, या साऱ्यास असलेले अमेरिकी सरकारचे आशीर्वाद आणि मदत, ज्यांनी या हितसंबंधांना आव्हान दिले त्यांचा कसे संपवले गेले, आलेंदेंनी पिनोचेच्या सैन्याला शरण न जाता आठ तास दिलेली झुंज, या साऱ्याचे वर्णन आहे. ते मुळातून वाचले पाहिजे.

आता एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा चिलीच्या जनतेने निवडणुकांद्वारे नवीन राज्यघटना बनविण्याच्या बाजूने कौल दिला आहे. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर अमेरिकानिवासी मार्क्सनवादी अर्थतज्ज्ञ रिचर्ड वुल्फ म्हणाले : ‘आता आलेंदे त्याच्या थडग्यात हसत असेल.’

nashkohl@gmail.com