26 September 2020

News Flash

चोखंदळ ‘ग्राहकां’ची पसंती..

‘बुकमार्क’नं चोखंदळ वाचक काय विकत घेतात, याचा कानोसा घेण्याचं ठरवलं

‘बुकमार्क’नं चोखंदळ वाचक काय विकत घेतात, याचा कानोसा घेण्याचं ठरवलं तेव्हा गेल्या वर्षभरात ज्या दर्जेदार पुस्तकांना मागणी होती, अशांची यादी करणं क्रमप्राप्त होतं. पण ही यादी करायची कशी? ‘बुकमार्क’च्या वाचकांकडूनच अशी यादी (वर्षभरात कोणती इंग्रजी पुस्तकं विकत घेतली, अशी) नोव्हेंबर-अखेरपासून मागवत राहणं हा एक पर्याय होता; पण ‘विकत घेणं’ -पर्यायानं स्वत:च्या संग्रहात ठेवणं- यापुरतं बुकमार्कच्या वाचकांचं इंग्रजी वाचन मर्यादित नाही. विकत न घेता ग्रंथालयातून अथवा परिचितांकडून वाचण्यासाठी पुस्तकं घेतली जातात. अशा वेळी, ‘किताब खाना’ या मुंबईच्या हुतात्मा चौकातल्या ग्रंथविक्री दालनानं मदतीची तयारी दाखवली. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सातत्यानं मागणी आणि विक्री असलेल्या दहा ललित (फिक्शन) आणि दहा ललितेतर (नॉन फिक्शन) पुस्तकांची ही यादी आहे.. वरच्या यादीतली दोन-तीन पुस्तकं (उदाहरणार्थ, पिकेटी आणि फुकुयामाची पुस्तकं, सचिन तेंडुलकरांचं नोव्हेंबर २०१४ मधलं आत्मकथन) २०१५ मध्ये प्रकाशित झालेली नाहीत. मात्र वर्षभर त्यांची मागणी सातत्यपूर्ण होती, हे महत्त्वाचं. ‘बलुतं’ हे दया पवारांचं पुस्तक मराठीत ‘साहित्य’ म्हणून गणलं जातं, पण ते आत्मकथन म्हणून इथं ललितेतर विभागात आहे.
यादीबद्दल मतभेद असू शकतात..

261215_LS_CTI_008

ते असले, तर जरूर कळवा. ई-मेल : loksatta@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:37 am

Web Title: top 10 books of the year
Next Stories
1 स्टॅन लीचा डब्बा!
2 ‘कालकात्ता’चं समाजदर्शन..
3 यादी होती वर्षांआधी; यादी उरली वर्षांनंतर..
Just Now!
X