हिमनद्यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश आपल्या श्वेतकांतीवरून परावर्तित करणे. या परावर्तनामुळे पृथ्वीचे तापमान मर्यादित राहते. हिमनद्या जसजशा आक्रसत आहेत, तसतसा सूर्याचा अधिकाधिक प्रकाश पृथ्वी शोषून घेत आहे आणि त्यातून पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
