19 October 2019

News Flash

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

सहा जणांविरूध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधिक छायाचित्र

हर्सुल परिसरातील सोळा वर्षीय बालिकेला घरात शिरुन लग्नासाठी पळविल्यानंतर तरुणाने तिला कोंडून ठेवत लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुटुंबियांना सांगितल्यास तुझ्यासह भावाला जीवे मारु अशी धमकी दिली. हा प्रकार डिसेंबर २०१८ मध्ये घडला. याप्रकरणी उमर शेख, शेख ईस्माईल, शेख फारुख, समीर भंगारवाला यांच्यासह अन्य दोन महिलांविरुध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सुल भागातील पीडीता भावासोबत घरात असताना २४ डिसेंबर २०१८ रोजी पहाटे तीनच्या सुमारास उमर शेखसह त्याचे मित्र आणि कुटुंबिय घरात शिरले. त्यांनी पीडीतेला लग्नासाठी जबरदस्तीने स्वत:सोबत नेहले. हा प्रकार पीडीतेच्या भावाने त्याच्या आईला पहाटे पाचच्या सुमारास कळवला. पीडीतेचा शोध सुरू असताना तिच्या कुटुंबियांनी उमर शेखचे घर गाठले. तेव्हा पीडीता जिन्सी पोलिस ठाण्यात असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यावरुन तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी चौकशी करुन पीडीतेला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. यानंतर कुटुंबियांनी तिला जालना जिल्ह््यातील आपल्या मुळगावी नेहले. त्यावेळी कुटुंबियांनी चौकशी केल्यावर पीडीतेने उमर शेख व त्याच्या कुटुंबियांनी आपल्याला कोंडून ठेवत त्याच्यासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्याचप्रमाणे उमरने आपले लैंगिक शोषण केले. त्याने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यास तुला व भावाला जीवे ठार मारीन, तुमची बदनामी करेन अशा धमक्या दिल्या. बदनामी होऊ नये म्हणून पीडीतेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली नाही. पण अशात शेख कुटुंबियांचा त्रास वाढत असल्याचे पाहून त्यांनी हर्सुल पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on January 8, 2019 7:48 pm

Web Title: 16 year girl rape incident in aurngabad