28 February 2021

News Flash

१ तलवार हजार रुपयात, औरंगाबादमधून १९ तलवारी जप्त

औरंगाबाद पोलिसांना जहाँगिर कॉलनीत राहणाऱ्या आलिम पठाण याच्या घरातून तलवारींची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

औरंगाबादमध्ये पोलिसांनी तलवारींचा साठा जप्त केला असून एका घरातून पोलिसांनी १९ तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारी एक हजार रुपयात विकल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी आलिम खान रहीम पठाण (वय ३५) या मुख्य आरोपीला अटक केली आहे.

औरंगाबाद पोलिसांना जहाँगिर कॉलनीत राहणाऱ्या आलिम पठाण याच्या घरातून तलवारींची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी पठाणच्या घरात छापा टाकून दोन तलवारी जप्त केल्या. पठाणच्या चौकशीतून नवी माहिती उघड झाली. पठाणने १९ तलवारींची विक्री केल्याचे समोर आले. या तलवारी त्याने शेख मोहसीन शेख मतीन (चार तलवारी), नफीस शहा शरीफ शहा (तीन तलवारी), इलीयास कुरेशी (दोन तलवारी), शेख परवेज शेख महेराज , शेख आमेर शेख इकबाल, शेख समीर शेख अय्युब, शेख असर, शेख आवेज शेख मेहराज यांना प्रत्येकी एक तलवार दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्वांविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन चोरट्यांनाही अटक केली आहे. सूर्यकांत उर्फ सनी जाधव (वय २२) आणि स्वप्नील उर्फ मोगली कुलकर्णी (वय २५) या दोघांनाही अटक केली आहे. हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांच्याविरोधात घरफोडीचे सहा गुन्हे दाखल होते. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सात तोळे सोने, एक लॅपटॉप व दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 4:52 pm

Web Title: 19 swords seized by police 5 arrested
Next Stories
1 दलित-मुस्लीम समीकरणाचा शहरी भागातच लाभ!
2 मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती, ३००० गावांची हंगामी पैसेवारी ५०च्या आत
3 लॅण्डिंग करताना मुंबई – औरंगाबाद विमानाला धडकला पक्षी आणि नंतर…
Just Now!
X