06 March 2021

News Flash

महिलांची २० लाखांची फसवणूक

मंगळवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉल्फीन अ‍ॅबोडस नावाची चिटफंड गुंतवणूक कंपनी उघडून प्रकाश सीताराम जाधव व अविनाश मिटबावकर या दोघांनी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फुलंब्री तालुक्यातील महिलांनी पोलिसांकडे केली आहे. कंपनीत एजंट म्हणून केवळ महिलांनाच स्थान दिले जात असे. तेक्रार देऊनही पोलीस कारवाई करीत नव्हते. मंगळवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

फुलंब्री तालुक्यातील शारदा राजेंद्र राजमुकुट, संगीता सोमनाथ घोडके व मालती अशोक वारेकर या तीन महिलांनी फसवणूक झाल्याचे पोलिसांना कळवले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रकाश जाधव, त्याच्यासमवेत समाधन कांबळे व गजानन पाटील यांनी डॉल्फीन अ‍ॅबोडस कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी लालूच दाखवली. घरबसल्या अधिक पैसे मिळतील, असे सांगून तुम्ही कंपनीचे एजंट व्हा, असा आग्रह धरला. प्रकाश जाधव याने फुलंब्री येथे ११ महिन्यांच्या करारावर किरायाने कार्यालयही थाटले होते. कंपनी नोंदणीकृत असल्याचे सांगत पैसे दुप्पट-तिप्पट होतील, असे गुंतवणुकीचे तक्ते व नकाशे एजंट म्हणून या महिलांकडे सुपूर्द केले. अधिकृत एजंट म्हणून नेमल्यानंतर २० लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. या नंतर नातेसंबंधातील व्यक्ती व मैत्रिणींना गुंतवणूक करण्यास या महिलांनी भाग पाडले. जाधव दिवसातून चार-पाच वेळा दूरध्वनी करीत असे. चांगले कमिशन मिळेल म्हणून प्रामाणिकपणे काम केले, मात्र गेल्या महिनाभरापासून त्याचा दूरध्वनी लागत नाही. तसेच कार्यालयालाही टाळे लागले. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार या महिलांनी दिली. फुलंब्री पोलीस ठाण्यात या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:04 am

Web Title: 20 lakh cheating with women aurangabad
Next Stories
1 लोकप्रभा ०३ जून २०१६
2 लोकप्रभा २७ मे २०१६
3 लोकप्रभा २० मे २०१६
Just Now!
X