19 October 2019

News Flash

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तरुण बलात्काराप्रकरणी तुरुंगात गेला

प्रेम, शरीरसंबंध, गर्भपातानंतर या प्रेमकथेचा शेवट पोलीस ठाण्यात झाला असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पाच महिन्यांपूर्वी पुंडलिकनगर येथे राहणारा हनुमंत शेरे हा तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडला… त्या तरुणीनेही त्याला होकार कळवला… घरच्यांपासून लपून- छपून दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या… प्रेम बहरत होते, जवळीक वाढत होती… सारं काही आनंदात सुरु असताना हनुमंतमुळे ती तरुणी गर्भवती झाली…हा प्रकार तरुणीच्या कुटुंबीयांना समजला आणि गर्भपातानंतर मुलीला घेऊन त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून  तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला… दुसरीकडे या सर्वघडामोडीची पुसटशी कल्पनाही नसलेला हनुमंत घरात पोलिसांना पाहून चक्रावून गेला…या प्रेमकथेचा शेवट आता तुरुंगात झाला असून हनुमंतला पोलिसांनी अटक केली आहे.

पुंडलिकनगर येथे राहणाऱ्या हनुमंत शेरे या तरुणाचे पाच महिन्यांपासून 19 वर्षांच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघेही कॉलेजमध्ये शिकतात. गेल्या महिनाभरापासून दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. पुढे जाऊन लग्न करण्याचे स्वप्न दोघेही रंगवत होते. दोघांमधील जवळीक वाढली आणि यातून ती तरुणी गर्भवती झाली.

दुसरीकडे 31 डिसेंबरच्या रात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हनुमंतने तिला मेसेज केला. फोनही केला. त्यावेळी तरुणीच्या आई- वडिलांना या प्रकारावर संशय आला. त्यांनी या प्रकाराकडे आधी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी गर्भवती असल्याचे त्या तरुणीला आणि तिच्या आई- वडिलांना समजले. आई- वडिलांनी आधी मुलीचा गर्भपात करवून घेतला. यानंतर त्यांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. आई-वडिलांच्या दबावापोटी मुलीनेही हनुमंतविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

हनुमंतला या घडामोडींची पुसटशीही कल्पना नव्हती. बुधवारी रात्री पोलीस हनुमंतच्या घरात गेले त्यावेळी हनुमंतला हा प्रकार समजला. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणी पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायंण शिनगारे अधिक तपास करत आहे.

First Published on January 4, 2019 12:53 am

Web Title: 22 year old youth arrested in rape case after girlfriend got pregnant in pundlik nagar